AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाईकच्या सीटखाली, पेट्रोल टाकीत तब्बल 500 दारुच्या बाटल्या लपवल्या, गुपित उघडल्यानंतर अटकेचा थरार

एका अवैध दारु विक्रेत्याने पोलिसांपासून बचाव व्हावा म्हणून थेट बाईकच्या सीटखाली, पेट्रोल टाकीत, तसेच एका पिशवीत एकूण 500 दारुच्या बाटल्या लपवल्याचं समोर आलं आहे (accused hid liquor bottles under the bike seat and in a petrol tank).

बाईकच्या सीटखाली, पेट्रोल टाकीत तब्बल 500 दारुच्या बाटल्या लपवल्या, गुपित उघडल्यानंतर अटकेचा थरार
| Edited By: | Updated on: May 21, 2021 | 11:51 AM
Share

गोंदिया : गुन्हेगार आपला गुन्हा लपवण्यासाठी नेमकी काय शक्कल लढवेल याचा काहीच भरोसा नाही. गोंदिया जिल्ह्यात पवनी पोलिसांना तर याचा प्रत्ययच आला आहे. एका अवैध दारु विक्रेत्याने पोलिसांपासून बचाव व्हावा म्हणून थेट बाईकच्या सीटखाली, पेट्रोल टाकीत, तसेच एका पिशवीत एकूण 500 दारुच्या बाटल्या लपवल्याचं समोर आलं आहे. मात्र, पोलीस त्यापेक्षा कैकपटीने हुशार असल्याने आरोपीची चोरी पकडली गेली. पोलिसांनी आरोपीला आता बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरु आहे (accused hid liquor bottles under the bike seat and in a petrol tank).

पोलिसांनी रंगेहात पकडलं

गोंदिया जिल्ह्यात पवनी पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्यांवर सिनेस्टाईल कारवाई केली आहे. पोलिसांनी मोटरसायकलवर दारुची वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडलं. आरोपीजवळ तब्बल 13 हजार 500 रुपयांचा दारुसाठा मिळाला. पोलिसांनी सर्व साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी सिने स्टाईल सापळा रचला होता. हा सर्वच प्रकार काल्पनिक वाटला असला तरी वास्तव्यात घडला आहे. आरोपी अवैध दारुविक्रीच्या हट्टाला पेटलेला असताना पोलिसांनी त्याला आळा घालण्यासाठी केलेली कारवाई खरंच कौतुकास्पद मानली जात आहे (accused hid liquor bottles under the bike seat and in a petrol tank).

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली

पवनी पोलिसांना कोदूर्ली गावानजीक अवैध दारुविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारावर आरोपींनी पकडण्यासाठी एक योजना आखली. त्यांनी सापळा रचून कोदूर्ली गावानजीक एक पथक तैनात केलं. संबंधित स्थळी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवराज चिनकम वेरपुरी (वय 38) एका दुचाकीने त्याच रस्त्याने जात होता. पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अडवणारे माणसं पोलीस असल्याचं आरोपीच्या लक्षात आलं.

पोलिसांनी सापळा रचत आरोपीला पकडलं

आरोपी शिवराजने बाईक दुसऱ्या मार्गाला वळवली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला. अखेर आठ किमी पाठलाग केल्यानंतर गोसिखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याच्या कोदूर्ली पुलाजवळ आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आलं. पोलिसांनी त्याची गाडीची झळती घेतली असता मोठा साठा त्यांच्या हाती लागला.

विशेष म्हणजे आरोपीने दुचाकीच्या शीटखाली, पेट्रोल टंकीत, गाडीला लटकवलेल्या हिरव्या बॅगेत 90 एमएलचे तब्बल 500 दारुच्या छोट्या बाटल्या लपवल्या होत्या. जवळपास 13 हजार 500 रुपयांचा हा मुद्देमाल होता. पोलिसांनी आरोपीच्या दुचाकीसह हा सर्व मुद्देमाल जप्त केला. दारुच्या बॅच नंबरच्या आधारावर दारु नेमक्या कोणत्या दुकानातील होती याचा शोध पोलीस घेत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलिस उपनिरीक्षक भिलावे, पो. हवा. गंगाधर नागरिकर, पो. ना. अनिल कळपते, पो. शी. संतोष लांजेवार, विनोद आरिकर, मपोशी सुप्रिया कान्हेकर यांनी केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे करीत आहेत.

हेही वाचा :

सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली, कोरोना काळात पुण्यातील धक्कादायक प्रकार

अहमदनगरमध्ये पुन्हा हनी ट्रॅप, बिझनेसमनचा अश्लील व्हिडीओ बनवून 1 कोटीची खंडणी

चौकावर हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सापळा रचत पकडलं, कुख्यात गुंडांना बेड्या

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.