AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रिटायर्ड सैन्य अधिकाऱ्याची अश्लिल छायाचित्रे काढून ब्लॅकमेल केले, अभिनेत्रीला झाली अटक

माजी लष्कर अधिकारी असलेल्या एका 75 वर्षीय इसमाची या अभिनेत्रीशी घर भाड्याने घेण्याच्या निमित्ताने फोनवरुन ओळख झाली होती. नंतर नित्या त्याचे घर पाहायला आली आणि नंतर त्यांची चांगली मैत्री झाली.

एका रिटायर्ड सैन्य अधिकाऱ्याची अश्लिल छायाचित्रे काढून ब्लॅकमेल केले, अभिनेत्रीला झाली अटक
handcuffs Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 28, 2023 | 9:25 PM
Share

कोल्लम | 28 जुलै 2023 : एका लष्करातील निवृत्त अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्या प्रकरणात एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला आणि तिच्या मित्राला अटक झाली आहे. या अभिनेत्रीने या 75 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे नग्न छायाचित्रे काढली आणि ती सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 25 लाखांची खंडणी मागितली.  या माजी लष्करी अधिकाऱ्याने अकरा लाख रुपये तिला दिले.  मात्र त्यानंतरही तिने आणखी पैसे मागितल्याने त्याने अखेर पोलीसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर अभिनेत्रीला तिच्या मित्रासह अटक करण्यात आली.

मळ्यालम अभिनेत्री निथ्या ससी ( 32 ) आणि तिचा मित्र बिनू या दोघांना या प्रकरणात अकरा लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अटक झाली आहे. 24 मे रोजी माजी लष्कर अधिकारी आणि केरळ युनिव्हर्सिटीचा माजी कर्मचारी असलेल्या एका 75 वर्षीय इसमाची या अभिनेत्रीशी घर भाड्याने घेण्याच्या निमित्ताने फोनवरुन ओळख झाली होती. नंतर नित्या त्याचे घर पाहायला आली नंतर त्यांची चांगली मैत्री झाली.

अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की नित्याने त्याचे कपडे काढले आणि त्या दोघांचे नग्न फोटो तिचा मित्र बिनू याने काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याचे धमकी देऊन आपल्याकडून 25 लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर त्यांनी अकरा लाख दिले आणि नंतर पुन्हा खंडणीसाठी धमक्या आल्यानंतर त्यांनी परावूर पोलिस ठाण्यात 18 जुलै रोजी तक्रार नोंदवली. पोलिस आता आरोपींना आणखी कुणाला या प्रकारे ब्लॅकमेल केले आहे का ? याचा शोध घेत आहेत.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.