मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला धक्का, मोबाईल हॅक करून अश्लील फोटो टेलिग्रामवर अपलोड
विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचा मोबाईल हॅक करून, तिचे अश्लील फोटो, व्हिडीओ टेलिग्रामवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे, मालाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

विविध मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या, अभिनेत्रीचा मोबाईल हॅक करून चोरलेले तसेच एडिट केलेले अश्लील फोटो टेलिग्रामच्या खासगी ग्रुपवर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित अभिनेत्री तक्राद दाखल नोंदवल्यानंतर मालाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लील फोटो प्रसारित करणाऱ्य आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. मात्र यामुळे बरीच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अभिनेत्री ही विविध मालिका आणि सिनेमात काम करते. ती तिच्या आईसह मालाड येथे राहते. टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका समूहावर तिचे काही अश्लील फोटो प्रसारित झाल्याची माहिती तिला तिच्या व्यवस्थापकाने दिली. टेलिग्रामचा ‘न्यू सायकल ऑन रोड ००’ नावाचा ग्रुप आहे , त्यात पैसे भरून सदस्य होता येते. मात्र या ग्रुपमध्ये युजर्सची ओळख काही उघड होत नाही.
याच ग्रुपमध्ये त्या अभिनेत्रीचे संपादित (एडिट) केलेले काही अश्लील फोटो पोस्ट करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मिस्टर रॉकी आरके या नावाच्या युजरने त्या अभिनेत्रीचे असे काही फोटो टाकले होते. त्यानंतर अभिनेत्रीने एका व्यक्तीला या समूहात पैसे भरून सामील करून घेतले. मात्र त्यानंतर तिला आणखी धक्का बसला आणि तिने पोलिसात तक्रार केली.
17 एप्रिल 2025 ते 19 में 2025 पर्यंतच्या कालावधीत या ग्रुपमध्ये त्या अभिनेत्रीचे अश्लील फोटो तसेच काही व्हिडीओ देखील रिलीज झाले होते. मात्र माझा मोबाईल हॅक करण्यात आला, आणि चोरून माझे अश्लील फोटो त्या ग्रुपवर अपलोड केले असे त्या अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. अभिनेत्रीच्या नावाने प्रीमियम व्हर्जन असे नमूद करून ही छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्या अभिनेत्रीच्या तक्रारीच्या आधारे मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे.
