AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीने बेडरुममध्ये लावला कॅमरा, बनवला अश्लील व्हिडिओ! नंतर ठेवली अट, सासऱ्यानेही मग… पोलिसही थक्क झाले

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रकरणात महिलेच्या पतीनेच अश्लील व्हिडीओ शूट केले. तसेच सासऱ्यानेही तिच्यावर बलात्कार केले.

पतीने बेडरुममध्ये लावला कॅमरा, बनवला अश्लील व्हिडिओ! नंतर ठेवली अट, सासऱ्यानेही मग... पोलिसही थक्क झाले
crimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 10, 2025 | 12:21 PM
Share

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून हुंड्यासाठी छळ, लैंगिक शोषण आणि दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या 7 महिन्यांनंतर पीडितेच्या वडिलांनी जावयाविरुद्ध आणि मुलीच्या सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

हा प्रकार आग्रा येथील कमला नगर परिसरातील आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न नोव्हेंबर 2024 मध्ये झाले होते. लग्नात सुमारे 1.50 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यामध्ये सोन्याचे दागिने, 40 लाख रुपये रोख, एक गाडी आणि फर्निचर यांचा समावेश होता. परंतु लग्नानंतर काही काळातच सासरच्या लोकांनी दोन कोटी रुपये अतिरिक्त हुंड्याची मागणी सुरू केली. मागणी पूर्ण न झाल्याने नवविवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला.

वाचा: नवरा दुबईवहून आला, शरीर संबंधाचा विषय काढताच… पत्नीचा दिरासोबत रात्रीस खेळ चाले, सासूला समजताच

बेडरूममध्ये गुप्त कॅमेरा आणि पतीची धमकी

पीडितेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिला काठीने बेदम मारहाण केली आणि तिच्यासोबत विचित्र कृत्यही केले. यापेक्षा वाईट म्हणजे, त्याने खोलीत गुप्त कॅमेरा लावला होता. ज्याद्वारे त्याने पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो सतत तिला ब्लॅकमेल करत होता. जेव्हा पीडितेने याबाबत तिच्या सासू आणि सासऱ्याला सांगितले, तेव्हा त्यांनीही तिला धमकावण्यास सुरुवात केली.

सासऱ्याने बलात्कार, पतीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला

पीडितेने सांगितले की, एके दिवशी तिचा पती तिला एका घरात घेऊन गेला जिथे आधीपासून एक तरुण उपस्थित होता. पतीने त्या तरुणाशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला आणि त्या तरुणानेही तिला धमकावले. पीडित कशीबशी तिथून निसटून घरी पोहोचली, तेव्हा तिच्या सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने या घृणास्पद कृत्याची तक्रार आपल्या पतीकडे केली, तेव्हा त्याने कथितपणे तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी ती कशीबशी आपल्या माहेरी पोहोचली आणि कुटुंबाला आपली व्यथा सांगितली. एसीपी छत्ता, पीयूष कांत राय यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?