AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayushi Murder : ट्रॉली बॅग, त्यात मुलीचा मृतदेह आणि वडिलांचा यमुना एक्स्प्रेस पर्यंतचा थरारक प्रवास!

आणखी एक मॅर्डर मिस्ट्री! हत्या करुन 12 तास मुलीचा मृतदेह घरातच ठेवला आणि त्यानंतर वडिलांनी...

Ayushi Murder : ट्रॉली बॅग, त्यात मुलीचा मृतदेह आणि वडिलांचा यमुना एक्स्प्रेस पर्यंतचा थरारक प्रवास!
आयुषी हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Nov 21, 2022 | 1:54 PM
Share

दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर (Shraddha Walkar Murder News) आता आणखी एक थरकाप उडवणारं हत्याकांड (Murder Mysterey) समोर आलंय. हे हत्याकांड आग्रामध्ये घडलं. एका बीसीए विद्यार्थीनीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचं शव हे यमुना एक्स्प्रेस (Yamuna Express) येथील सर्विस रोडवर एका ट्रॉली बॅगमध्ये फेकून देण्यात आलं होतं. दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हे प्रकरण कळल्यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली, तेव्हा या मृत मुलीचे वडिलही घरी नसल्याचं उघडकीस आलं. अखेर पोलिसांच्या तपासाअंती वडिलांनीच आपल्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली असल्याचं निदर्शनास आलंय.

18 नोव्हेंबर रोजी एक बॅग पोलिसांना आढळून आली. या बॅगच्या आजूबाजूला रक्ताचे डाग दिसले होते. या बॅगमध्ये एका मुलीचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा मृतदेह आयुषी नावाच्या एका विद्यार्थीनीची असल्याचं समोर आलं. ही विद्यार्थीनी बीसीएचं शिक्षण घेत होती.

मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या घरचा पत्ता 48 तासांच्या आत शोधून काढला. जेव्हा पोलीस मृत मुलीच्या घरी पोहोचले, तेव्हा तिथे मुलीचे वडील नितीश यादव घरी नव्हते. त्याच क्षणी पोलिसांना मुलीच्या वडिलांवर हत्येचा संशय आला होता. अखेर पोलिसांनी रविवारी मृत मुलीच्या वडिलांना शोधून काढलं आणि त्यांची चौकशी केली.

चौकशीअंती मृत मुलीच्या वडिलांनी हत्येची कबुली दिलीय. राहत्या घरातच आयुषीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याचं त्यांनी कबूल केलं. दरम्यान, पोलिसांनी अद्याप या हत्येचं कारण नेमकं काय होतं, हे स्पष्ट केलेलं नाही. आज या प्रकरणाचे सगळे खुलासे पोलीस पत्रकार परिषद घेऊन करण्याची शक्यताय.

17 नोव्हेंबर पासूनच 21 वर्षांची आयुषी यादव बेपत्ता होती. पण ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस देण्यासाठी तिच्या घरातून कुणीच आलं नव्हतं. शिवाय तिचे वडीलही घरातून नेमके कुठे गायब झाले होते, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. आयुषी आणि तिचे कुटुंबीय दिल्लीतील मोड बंद या गावात राहत होते. आयुषीच्या हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

आषुषीची हत्या 17 नोव्हेंबर रोजी करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली जातेय. त्यानंतर तिचा मृतदेह घरातच ठेवला गेला होता. रात्र झाल्यानंतर आयुषीचे वडील तिचा मृतदेह घेऊन ट्रॉली बॅगसह घरातून निघाले. ट्रॉली बॅगमधील तिचा मृतदेह ते वाटेत यमुना एक्स्प्रेवर फेकण्याच्या इराद्याने निघाल्याची पोलिसांना शंका आहे.

पण वाटेत कुठेच संधी न मिळाल्यानंतर यमुना एक्स्प्रेस वे च्या किनाऱ्यावर मृतदेहाने भरलेली ट्रॉली बॅग नंतर आढळली. यानंतर एकच खळबळ उडाली होती. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत पुढील कारवाई केली.

आता हे हत्याकांड नेमकं कोणत्या कारणावरुन घडलं? कुणी घडवून आणलं? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल पोलिसांच्या तपासाअंती होईल. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?