‘तुमचा कार्यक्रमच करतो’ म्हणत घराच्या गच्चीवरुन खाली फेकलं! नगरमधील खळबळजनक घटना

'तुमचा कार्यक्रमच करतो' म्हणत घराच्या गच्चीवरुन खाली फेकलं! नगरमधील खळबळजनक घटना
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9 Marathi

Ahmednagar Crime News : गेल्या काही दिवासांत मित्रामित्रांमध्ये वाद होण्याच्या घटना वाढल्यात. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.

दादासाहेब कारंडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 29, 2022 | 10:41 AM

अहमदनगर : तरुणांमध्ये वाद होणं, बाचाबाची करुन मारहाणीच्या घटना घडणं काही नवं नाही. शुल्लक कारणावरुन वाद होऊन मित्र मित्राच्या जीवावर उठत (Fight Between friends) असल्याच्या घटनाची गेल्या काही दिवसात वाढलेल्या आहेतच. या खळबळजनक घटनांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलेली असतानाच आता अहमदनगर (Ahmednagar Crime News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. तुमचा कार्यक्रमच करतो, असं म्हणत घराच्या गच्चीवरुन एकास खाली फेकण्यात आलं. तर दुसऱ्यावर तलवारीनं हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना पंटवटीनगर इथं घडली. सोमवारी 23 मे रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलिसांनी (Ahmednagar Police) गुन्हा दाखल केला आहे. एकूण नऊ जाणांविरोघात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत कारवाई केली आहे. या घटनेमध्ये तिघे जण जखमी झालेत. आठवड्याभरानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

काय झालं होतं?

तरुणांच्या दोन गटात वाद होऊन राडा झाला. त्यातूनच हा प्रकार घडला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या तोफखाना पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

अंकुश चत्तर, महेश मते, चंदन ढवण, शिवलिंग शिंदे, अक्षय टेकाळे, प्रतीक मगर, सोन्या कोहक, अजिंक्य भुजबळ, मयुर सूर्यवंशी या तरुणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी केली जातेय. यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये रोहित मिलन जोशी, अजित बाबर, स्वप्निल सब्बन या तिघांना गंभीर दुखापत झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मित्रामित्रांमध्ये वाद

गेल्या काही दिवासांत मित्रामित्रांमध्ये वाद होण्याच्या घटना वाढल्यात. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. शुल्लक वादातून टोकाचा वाद होऊन मारहाणीच्या घटना होणं, बाचाबाची होतं किंवा हत्येसारख्या घटनांची नोंद गेल्या काही दिवसांत सातत्यानं हाताना पाहायला मिळतेय. त्यामुळे मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला जाण्याचे प्रकारांत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें