AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Missing | सर्वाधिक महिला बेपत्ता होणारा जिल्हा अमरावती, काय आहेत पाच कारणं?

संसाराचा गाडा हाकताने भांड्याला-भांडे हे लागणारच. पण दिवसेंदिवस पती-पत्नीमधील वाद हे विकोपाला पोहचत आहेत. लहान-मोठ्या कारणावरुन टोकाची भूमिका घेतली जात आहे. कारण क्षुल्लक पण निर्णय मोठा घेऊन संसार मोडल्याच्या अनेक घटना घडत आहे. त्यामुळे नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून किंवा सतत होणाऱ्या वादाला वैतागूनही महिलांनी घर सोडल्याचे प्रकार घडलेले आहेत.

Missing | सर्वाधिक महिला बेपत्ता होणारा जिल्हा अमरावती, काय आहेत पाच कारणं?
अमरावती पोलिस महानिरीक्षक कार्यालयImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 30, 2022 | 10:10 AM
Share

अमरावती : काळाच्या ओघात देश प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय यंदा 75 वा स्वतंत्र अमृत महोत्सवही साजरा होत आहे. हे सर्व असले तरी आपली दुसरी बाजूही निरखणे तेवढेच आहे. (West Vidarbha) पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल 815 महिला (Woman Missing) ह्या बेपत्ता झाल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची कारणे वेगवेगळी असली तर या विभागातील (Amravati) अमरावती जिल्ह्यातून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये तरुण मुलींचाही समावेश आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या 5 जिल्ह्यात 3 महिन्यात 815 महिला आणि तरुणी बेपत्ता असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  1. पतीसोबत भांडण संसाराचा गाडा हाकताने भांड्याला-भांडे हे लागणारच. पण दिवसेंदिवस पती-पत्नीमधील वाद हे विकोपाला पोहचत आहेत. लहान-मोठ्या कारणावरुन टोकाची भूमिका घेतली जात आहे. कारण क्षुल्लक पण निर्णय मोठा घेऊन संसार मोडल्याच्या अनेक घटना घडत आहे. त्यामुळे नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून किंवा सतत होणाऱ्या वादाला वैतागूनही महिलांनी घर सोडल्याचे प्रकार घडलेले आहेत. यानंतर समुपदेशन आणि सल्ल्याने पुन्हा संसार हे जुळलेले देखील आहेत.
  2. प्रेमप्रकरणातून ठोकली धूम काळाच्या ओघात समाजव्यवस्थेमध्येही बदल होत आहे. तरुण-तरुणींच्या प्रेमात जर कुटुंबियांचा अडसर होत असेल तर थेट पळून जाण्याचा मार्ग स्विकारला जात आहे. त्यामुळेच महिलांपाठोपाठ तरुण मुलीदेखील घर सोडून जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
  3. फूस लावून पळून नेणे स्वप्नरंजक अशी आश्वासने देऊन तरुणी किंवा महिलांना पळून नेण्याच्या घटना देखील वाढत आहे. समाजव्यवस्थेचे चित्र बदलत असून अशा आश्वासनांपासून महिला आणि तरुणींनी कायम सावध राहणे गरजेचे आहे. फूस लावून पळून नेले तरी अशा महिलांचे परत येण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. यापैकी 50 टक्के महिला ह्या परत आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
  4. कुटुंबियांशी वाद महिलांनी पतीशी जुळवून घेतले तरी सासरच्या मंडळशी ते सहज शक्य होत नाही. त्यामुळे वेळोवेळी खटके हे उडतातच. याचे प्रमाण वाढत जाते आणि कौटुंबिक वादातूनही महिलांनी घर सोडल्याच्या घटना या पाच जिल्ह्यांमध्ये घडलेल्या आहेत. हे सर्व असले वादामुळे कुटुंभ विभक्त झाले तरी अशा प्रकरणातील 50 टक्के महिला ह्या परत येत आहेत.
  5. स्वतंत्र पथकाची आवश्यकता विविध कारणामुळे महिला आणि तरुणी ह्या बेपत्ता होत असल्या तरी अमरावती जिल्ह्यातून काही महिलांचा मानवी तस्करीसाठी सुद्धा उपयोग केला जात आहे. त्यामुळे अशा महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिस विभागाने स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी केली आहे. पोलीस यंत्रणेबरोबरच समुपदेशनही तेवढेच महत्वाचे आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश