AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amrutsar Fire : शेतांमध्ये लावलेल्या आगीत 24 मुले घेऊन जाणारी स्कूल बस अडकली, ज्वाळांमध्ये सात मुले होरपळली, काचा फोडून केली मुलांची सुटका

पंजाब सरकार आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या आवाहनानंतरही, शेतकरी गव्हांच्या शेतातील काड जाळायचे थांबलेले नाहीत. बुधवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेत स्कूल बस या आगीच्या ज्वाळांमध्ये सापडली. बाटलापासून जवळ असलेल्या बिजलीगावाजवळ शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी ही बस चालली होती.

Amrutsar Fire : शेतांमध्ये लावलेल्या आगीत 24 मुले घेऊन जाणारी स्कूल बस अडकली, ज्वाळांमध्ये सात मुले होरपळली, काचा फोडून केली मुलांची सुटका
शेतांमध्ये लावलेल्या आगीत 24 मुले घेऊन जाणारी स्कूल बस अडकलीImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 04, 2022 | 10:07 PM
Share

अमृतसर – गव्हाच्या शेतातलं (Wheat Farm) काड जाळण्यासाठी लावलेल्या आगीत स्कूल बस (School Bus) अडकल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये (Punjab Fire) बटाला येथे घडली. या बसमध्ये असलेले सात विद्यार्थी या आगीत वाईटरित्या अडकले. अखेरीस बसच्या काचा फोडून या मुलांना बाहेर काढावे लागले. आगीत होरपळलेल्या या सातही मुलांची प्रकृती गंभीर असून, त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून त्यांना हायर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. या बसमधून 42 विद्यार्थी प्रवास करत होते. पंजाब सरकार आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या आवाहनानंतरही, शेतकरी गव्हांच्या शेतातील काड जाळायचे थांबलेले नाहीत. बुधवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेत स्कूल बस या आगीच्या ज्वाळांमध्ये सापडली. बाटलापासून जवळ असलेल्या बिजलीगावाजवळ शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी ही बस चालली होती. या बसमधून 42 विद्यार्थी प्रवास करीत होते.

बस कशी सापडली ज्वाळांमध्ये

बस जेव्हा बिजलीगावात पोहचली तेव्हा शेतातील गव्हाच्या काडाला आग लावण्यात आलेली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतांमध्ये ही आग पसरलेली होती. आगीच्या धुरामुळे बस चालकाला समोरचे काही दिसत नव्हते. त्यामुळे बस एका शेतात जाऊन पलटली. यानंतर काही वेळातच संपूर्म बस आगीच्या ज्वाळांमध्ये सापडली.

मुलांच्या किंकाळ्या ऐकून रस्त्याने जाणारे थांबले

बस आगीच्या ज्वाळांमध्ये सापडल्यानंतर, बसमधील विद्यार्थ्यांनी भीतीने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. या मुलांच्या किंकाळ्या ऐकून रस्त्यानी जाणारे अनेक जण घटनास्थळी पोहचले. त्यांनी बसच्या काचा फोडल्या आणि मुलांना बाहेर काढले. यातही ४२ पैकी ७ मुलं आगीत होरपळली. त्यानंतर स्थानिकांची या मुलांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या लहानग्यांच्या किंकाळ्या ऐकवत नव्हत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग इतकी भयंकर होती की मुलांना बाहेर काढणे अवघड असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या.
Amravati MLC Election 2026 Result: प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत काय घडतंय?
नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय....
Nagpur MLC Election 2026 Result : नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय परिणाम होणार?