घाणेरडे पाय घेऊन बेडवर चढला मुलगा, संतापलेल्या पित्याने ‘ही’ धक्कादायक शिक्षा

मयत बालकाची आई नीलम हिने आरोपी प्रेमवीर सोबत दुसरा विवाह केला होता. चार महिन्यांपूर्वीच हा विवाह झाला होता. नीलमला पहिल्या पतीपासून दोन मुले होती.

घाणेरडे पाय घेऊन बेडवर चढला मुलगा, संतापलेल्या पित्याने 'ही' धक्कादायक शिक्षा
घरगुती भांडणातून पतीकडून पत्नीची हत्याImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 9:49 PM

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरामध्ये गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घाणेरडे पाय घेऊन बेडवर चढला म्हणून सावत्र बापाने 11 वर्षाच्या मुलाची बेदम मारहाण करत हत्या (Step Father Killed Son) केली. याप्रकरणी मथुरा पोलिसांनी (Mathura Police) आरोपी बापाला अटक केली आहे. प्रेमवीर असे आरोपी बापाचे नाव आहे. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मथुरेतील ठाणे हायवे परिसरातील पुष्प विहार कॉलनीत ही घटना घडली आहे.

नीलमने प्रेमवीरसोबत दुसरा विवाह केला होता

मयत बालकाची आई नीलम हिने आरोपी प्रेमवीर सोबत दुसरा विवाह केला होता. चार महिन्यांपूर्वीच हा विवाह झाला होता. नीलमला पहिल्या पतीपासून दोन मुले होती. त्यानंतर तिने प्रेमवीरसोबत प्रेमविवाह केला होता. आरोपी पत्नी नीलम आणि तिच्या दोन मुलांसह पुष्पा विहार कॉलनीत राहत होता.

घाणेरडे पाय घेऊन बेडवर चढला म्हणून बेदम चोपले

नीलमचा मोठा मुलगा घाणेरडे पाय घेऊन बेडवर चढल्याने आरोपी प्रेमवीरचा पारा चढला. याच रागातून त्याने मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत 11 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला, असे एसपी सिटी मातम प्रकाश सिंह यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

लहान मुलाच्या जबानीवरुन हत्येचा गुन्हा दाखल

ही सर्व घटना घडली तेव्हा नीलमचा 7 वर्षाचा दुसरा मुलगा तिथेच होता. मथुरा पोलिसांनी लहान मुलाच्या जबाब नोंदवत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपीने हत्येची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.