AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत समजून कुटुंबीयांनी केले अंत्यसंस्कार, 30 वर्षांनी घरी परतलेल्या वृ्द्धाची वेदनादायी कहाणी वाचाच !

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 30 वर्षांपूर्वी ते ओब्रा येथे काम करत असताना ते मैहर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर काही लोकांनी त्यांना फसवून मुंबईला नेले.

मृत समजून कुटुंबीयांनी केले अंत्यसंस्कार, 30 वर्षांनी घरी परतलेल्या वृ्द्धाची वेदनादायी कहाणी वाचाच !
मृत समजून कुटुंबीयांनी केले अंत्यसंस्कारImage Credit source: News 18
| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 9:07 PM
Share

उत्तर प्रदेश : मृत समजून ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले तो 30 वर्षांनी घरी सुखरुप परतला आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. वृद्धाची वेदनादायी कहाणी ऐकल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. रामकिशुन नामक व्यक्तीला 30 वर्षे बंदिवासात (Confinement) ठेवून काम करायला लावले आणि जेव्हा त्याचे शरीर थकले तेव्हा त्याला त्याच्या घरी सोडण्यात आले. त्याच्या पुनरागमनामुळे कुटुंब आनंदी आहे. पण त्याची दयनीय अवस्था पाहून कुटुंबीयांना वाईटही वाटले. विशेष म्हणजे या वृद्धाचा मृत्यू झाला समजून कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार (Funeral) केले होते. आता वृद्धाचे कुटुंबीय न्यायाची मागणी (Demand for Justice) करत आहेत.

कुटुंबीयांनी मृत समजून अंत्यसंस्कारही केले

रामकिशूनचे निर्जीव शरीर आणि त्यावरील खुणा त्यांच्या वेदनादायक कहाणी सांगण्यासाठी पुरेशा आहेत. या वृद्धाने जवळपास 30 वर्षांपासून सहन केले आहे. 16 वर्षांपूर्वी कुटुंबाने त्यांचे अंतिम संस्कारही केले होते. 30 वर्षांनंतर जिवंत परतलेला रामकिशून हा मुगलसराय भागातील लेदुआपूर गावचा रहिवासी आहे.

सुरुवातीला तो सोनभद्र जिल्ह्यातील ओब्रा पॉवर हाऊसच्या कॅन्टीनमध्ये काम करत होता. तेथून अचानक गायब झाला. त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी गेल्या सोमवारी तो आपल्या घरी परतला. मात्र, त्यांच्या शरीरातील एका बाजूचे अवयव काम करत नव्हते.

मैहर देवी दर्शनासाठी गेला तो घरी परतलाच नाही

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 30 वर्षांपूर्वी ते ओब्रा येथे काम करत असताना ते मैहर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर काही लोकांनी त्यांना फसवून मुंबईला नेले. तिथे त्यांना मिठाईच्या कारखान्यात ठेवले आणि 15 वर्षे ओलीस ठेवण्यात आले.

यादरम्यान कसा तरी रामकिशून तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि वाराणसीच्या कॅन्ट स्टेशनवर पोहोचला. येथून पुन्हा एकदा त्यांना बळजबरीने बाबतपूर विमानतळाजवळील ढाब्यावर नेले आणि तेव्हापासून ते त्यांना ओलीस ठेवत राहिले.

बंदिवासात अनेक प्रकराची औषध देण्यात आली

यादरम्यान रामकिशूला अनेक प्रकारची औषधे दिल्याचेही सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते आणि नंतर औषध देऊन झोपवण्यात यायचे. मात्र याच दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांना डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला होता. त्यामुळे एक पाय आणि एक हात काम करणे बंद झाले. त्यानंतर काही लोक त्यांना त्यांच्या घरी सोडून निघून गेले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.