AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan | आर्यन खानप्रकरणी समीर वानखेडेंवर भडकले असदुद्दीन ओवैसी; म्हणाले “जो अधिकारी मुस्लिम..”

वानखेडे यांनी त्यांच्या परदेश दौऱ्याबाबतच्या खर्चाबद्दल चुकीची माहिती दिली होती, असंही एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाच्या अहवालात म्हटलंय. वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्यांचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं नाही.

Aryan Khan | आर्यन खानप्रकरणी समीर वानखेडेंवर भडकले असदुद्दीन ओवैसी; म्हणाले जो अधिकारी मुस्लिम..
Image Credit source: Instagram
| Updated on: May 16, 2023 | 3:49 PM
Share

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आहे. याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील छाप्यादरम्यान आर्यनला वाचवण्यासाठी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या पथकाने त्याच्या कुटुंबीयांकडे 25 कोटींची लाच मागून 18 कोटी रुपयांवर डीलची तयारी दाखवली होती. आर्यनाच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागणारा खासगी पंच के. पी. गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचं खोटं चित्रही वानखेडेंच्या पथकाने उभं केलं होतं. तसंच 17 जणांची नावं संशयित म्हणून वगळून त्यांना सोडण्याची परवानगी दिली होती. त्यात एका कथित ड्रग्ज विक्रेत्याचा समावेश होता, असा ठपका एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी आता AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत लिहिलं, ‘एका अभिनेत्याच्या मुलाला खोट्या केसमध्ये फसवण्याच्या आरोपाखाली एनसीबी अधिकाऱ्यावर सीबीआय कारवाई करत आहे. जे अधिकारी मुस्लिम आणि आदिवासींवर दहशतवाद्याचे खोटे आरोप करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, त्यांनासुद्धा तुरुंगात डांबलं पाहिजे. असे हजारो केसेस आहेत ज्यामध्ये निरपराध लोकांना वर्षानुवर्षे तुरुंगात राहावं लागतंय. कोर्टात सर्व आरोप निराधार ठरतात. प्रत्येक निरपराध तरुणाचं महत्त्व तेवढंच असलं पाहिजे.’

वानखेडेंच्या पत्नीची प्रतिक्रिया

“त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतोय”, असं समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर म्हणाली. तर दुसरीकडे देशभक्त असल्याचं बक्षीस मिळत असल्याची प्रतिक्रिया वानखेडेंनी शनिवारी दिली आहे.

समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

“मी देशभक्त असल्याचं बक्षीस मला मिळत आहे. काल सीबीआयच्या 18 अधिकाऱ्यांनी माझ्या घरी छापे मारले. माझ्या पत्नी आणि मुलांसमोर जवळपास 12 तास ही छापेमारी सुरू होती. त्यांना 23 हजार रुपये आणि चार प्रॉपर्टीची कागदपत्रं सापडली. मी कामावर रुजू होण्याआधी ती प्रॉपर्टी घेतली होती”, असं ते म्हणाले.

वानखेडे यांनी त्यांच्या परदेश दौऱ्याबाबतच्या खर्चाबद्दल चुकीची माहिती दिली होती, असंही एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाच्या अहवालात म्हटलंय. वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्यांचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं नाही. परदेश दौऱ्यांचे स्रोतही त्यांनी जाहीर केलं नाही. वानखेडे यांनी विभागाला न कळवता या खासगी संस्थेबरोबर महागड्या मनगटी घडाळ्यांची खरेदी-विक्री केल्याचंही चौकशी अहवालात म्हटलं आहे. तर वानखेडे यांची मालमत्ता आणि त्यांचं उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा