AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर अशोक धोडी यांचा कधीच पत्ता लागला नसता… एक सेन्सरचा मायक्रो तुकडा सापडला अन्… कसा लागला छडा?

पालघरचे शिवसेना नेते अशोक धोडी यांची हत्या करून त्यांचा मृतदेह गुजरातच्या एका खदानीत फेकण्यात आल्याचे उघड झाले आहे. 11 दिवसांनंतर त्यांचा मृतदेह आणि गाडी सापडली. सीसीटीव्ही फुटेज आणि एक छोटा सेन्सर यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला.

तर अशोक धोडी यांचा कधीच पत्ता लागला नसता... एक सेन्सरचा मायक्रो तुकडा सापडला अन्... कसा लागला छडा?
अशोक धोडी मर्डर केस
| Edited By: | Updated on: Feb 04, 2025 | 8:12 AM
Share

शिवसेनेचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. पालघर पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने आणि सर्वच अँगलने तपास केला. त्यामुळेच तब्बल 11 दिवसानंतर अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला. तसेच त्यांची गायब झालेली कारही सापडली आहे. विशेष म्हणजे धोडी यांची हत्या करून त्यांना कार सकट गुजरातच्या एका बंद पडलेल्या खदानीत फेकून देण्यात आलं होतं. मारेकऱ्यांनी प्लान असा केली होता की, धोडी हे कधीच सापडले नसते. पण सेन्सरचा एक मायक्रो तुकडा सापडला आणि या खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी या तुकड्यावरून थेट गुजरातला जाऊन धोडी यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

अशोक धोडी आणि मुख्य सूत्रधार आरोपी अविनाश धोडी यांचा मागील काही वर्षांपासून घरपट्टी आणि दारू सप्लायवरून कौटुंबिक वाद होता. आरोपी अविनाश धोडी यांचा दमन आणि दादरा नगर हवेली येथील दारू अवैधरित्या महाराष्ट्रात आणून विकण्याचा व्यवसाय होता. अशोक धोडी यांनी या विरोधात अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे अशोक यांची अडचण ठरत असल्याने आरोपीने अनेकवेळा अशोक धोडींवर हल्लेही घडवून आणल्याचं समोर आलं आहे.

आरोपीच्या गावातच…

20 जानेवारी रोजी अशोक धोडी यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी अशोक धोडी यांचं घर, गाडी आणि गुजरातच्या सारिग्राममधील बंद पडलेल्या दगड खदानीची रेकी केली होती. तब्बल महिनाभर ही रेकी सुरू होती. या हत्येतील जे तीन आरोपी फरार आहेत, त्यातील एक आरोपी सारिग्राम येथील रहिवासी आहे. त्याला या दगड खाणीची माहिती होती. ही दगड खाण बंद आहे. तसेच अत्यंत खोल आहे. या ठिकाणी कोणीही फिरकत नाही. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दगड खाणीतील पाणी कधीच आटत नाही. ही माहिती असल्यानेच आरोपीने या खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह टाकण्याचा प्लान आखल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

आड मार्गांचीही रेकी

कोणत्या आड मार्गाने गेल्यास आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सापडणार नाही याचा अंदाज आरोपींनी महिनाभर आधीच घेतला होता. त्यातच अवैध दारू तस्करी करत असल्याने या आरोपींना आडमार्गांचा चांगलाच अनुभव होता. अपहरण आणि हत्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आरोपींनी आपले सर्व मोबाईल एकाच ठिकाणी ठेवले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हे केलं. हत्या झाली त्या दिवशी एकाच ठिकाणी बसून रात्रभर पार्टी करत असल्याचं भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

300 सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण…

अशोक धोडी यांची लाल कलरची ब्रिझा कार डहाणू रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये उभी असताना या गाडीची आरोपीकडून रेकी करण्यात आली. पण या गाडीचे GPS ऍक्टिव्ह नसल्याने गाडी शोधण्यात पोलिसांना मोठा अडथळा ठरत होता. पालघर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने परिसरातील 300 च्यावर सीसीटीव्ही तपासले असता गुजरात हद्दीतील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात धोडी यांची गाडी पोलिसांना दिसली होती. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व दगड खाणी पोलीस तपासत होते.

एका सीसीटीव्हीत गाडी दिसली अन्…

आरोपींनी हत्येच्या दिवशी अशोक धोडी यांचा पाठलाग केला. त्यानंतर झाई बोरीगाव येथील घाटात आयसर टेम्पो अशोक धोडी यांच्या गाडी पुढे लावून मागे पिकअप थांबवली. त्यामुळे अशोक धोडी यांना पळ काढता आला नाही. याच घाटात आरोपींनी अशोक धोडी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार केले. त्यात धोडी ठार झाले. त्यानंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून अशोक धोडी यांची गाडी घेऊन आरोपी अशोक धोडी यांच्या घराजवळून भरधाव वेगात गेले. काही अंतरावर गेल्यावर आरोपींनी मृतदेह आणि गाडीची विल्हेवाट लावण्यासाठी आड मार्ग निवडला. मात्र गुजरातमधील एका रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही गाडी दिसली आणि अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून पालघर पोलिसांनी गुजरातमधील दगड खाणींची पाहणी सुरू केली.

अन् मृतदेह सापडला

पाहणी करताना एका पाणी असलेल्या खोल दगड खाणीच्या टेकड्यावर असलेल्या एका दगडाला गाडीच्या बॉडीचा खालचा पार्ट घासला गेल्याचं दिसलं. पोलिसांनी अधिक निरखून पाहिलं असता या दगडाला गाडीचा एक लहान सेंसर अडकलेला आढळला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. गाडी याच दगड खाणीत असेल याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने खाणीच्या पाण्यात गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा शोध सुरू असताना गाडी 40 फूट खोल पाण्यात आढळली. 31 जानेवारीला पहाटे गोताखोरांच्या मदतीने या दगड खाणीची पाहणी करण्यात आली. यावेळी 40 ते 45 फूट खोल पाण्यात एक लाल कलरची ब्रिझा कार असल्याची माहिती गोताखरांकडून समोर आली. त्यानंतर 6 ते 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही गाडी पाण्याबाहेर काढण्यात पालघर पोलिसांना यश आलं. अन् गाडीच्या डिक्कीत अशोक धोडी यांच्या तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधून असलेला मृतदेहही आढळला.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.