प्रेमाला नकार दिल्याने तरुणाचा संताप, मग अल्पवयीन मुलीसोबत जे घडलं ते भयंकर

एका तरुणाचे अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. पण मुलीचा या प्रेमसंबंधाला नकार होता. मुलगी प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने तरुण संतापला आणि पुढे जे घडलं ते भयंकर होतं.

प्रेमाला नकार दिल्याने तरुणाचा संताप, मग अल्पवयीन मुलीसोबत जे घडलं ते भयंकर
चंद्रपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर हल्ला
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 14, 2023 | 11:14 AM

चंद्रपूर : प्रेमाला नकार दिल्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने पेट्रोल टाकल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. मात्र मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने तेथून पळ काढला आणि पुढील अनर्थ टळला. भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथे सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिच्या घरात प्रवेश करून पेट्रोल टाकले. मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सिद्धांत भेले या तरुणावर काल रात्री जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करत अटक केली.

एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला

आरोपी तरुण आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपी आयटीआयचा विद्यार्थी असून, तो चंद्रपूर येथे शिक्षण घेत आहे. आरोपीचे अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. मात्र मुलीचा त्याच्या प्रेमाला नकार होता. याच रागातून त्याने मुलीच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने आरोपीने पळ काढला. यामुळे मुलीचा जीव बचावला आहे. यानंतर मुलीच्या तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसात तक्रार दिली. पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोमवारी आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमासाठी प्रपोज केले. मुलीने त्याला ठाम शब्दात नकार दिला. दरम्यान, काही वेळाने आरोपी सिद्धांत याने एका बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन थेट पीडित मुलीच्या घरी गेला आणि अंगावर टाकून जाळण्याच्या प्रयत्नात असताना कुटुंबीयांनी धावाधाव करून मुलीला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.