Aurangabad Crime : औरंगाबाद आहे की धनबाद? जीवघेणे हल्ले थांबेनात, 2 भावांवर रॉड, लाठ्या-काठ्यांनी हल्ला

Aurangabad Crime : ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवलाय.

Aurangabad Crime : औरंगाबाद आहे की धनबाद? जीवघेणे हल्ले थांबेनात, 2 भावांवर रॉड, लाठ्या-काठ्यांनी हल्ला
जीवघेणी मारहाणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 12:00 PM

औरंगाबाद : औरंगाबादेमध्ये (Aurangabad Crime) जीवघेण्या हल्ल्यांचं सत्र सुरुच आहे. औरंगाबादेत दोन भावांवर टोळक्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामधेय दोघे जण जखमी झालेत. लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण यावेळी करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवलाय. सात जणांविरोधात पोलिसाांनी गुन्हा नोंदवून घेतला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आता अधिक तपास करत आहेत. औरंगाबादच्या (Aurangabad News) करमाडजवळील शेकटा भागात हा हल्ला करण्यात आला. भर रस्त्यात दहशत माजवत दोघांना मारहाण करण्यात आली. अवैध धंद्याबाबत पोलिसांनी माहिती दिल्याचा संशय असल्यावरुन दोघा भावंडाना मारहाण करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील 30 वर्षीय फारुख कैसर बैग आणि औरंगाबादच्या नारेगाव येथील राहणारा 25 वर्षीय अरबाज अय्युब बेग मिर्झा यांना टोळक्यानं जबर मारहाण केली. रॉड आणि लाठ्यांना यावेळी हल्ला चढवण्यात आला. अचानक काही चोरट्यांची टोळी दुकानावर आली आणि त्यांनी रॉड, लाठ्या काठ्यांनी दोघांसोबत बाचाबाची करत त्यांना बेदम मारहाण केली.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

का केला हल्ला?

जखमी अरबाजचे वडील अय्युब बेग हे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती पोलिसांना पुरवितात, असा संशय आरोपिना होता. दरम्यान फारुख आणि कैसार हे दोघेही शेकटा येथील फारुखच्या वडिलांच्या कार्यालयाबाहेर वडिलांची वाट पाहतो. रात्री 9.30 वाजता ते दोघेही थांबले होते. त्याचवेळी पाच ते सहा दुचाकीवरून दहा ते बारा आरोपी हातात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडे घेऊन आले आणि त्यांनी दोन्ही तरुणावर हल्ला चढविला.

दोघांनीही कशीबशी स्वतःची सुटका करून पळ काढला. या हल्ल्यात दोघेही तरुण जखमी झालेत. या हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातिल सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.