AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Crime: फरार कुख्यात गुंड शहरात आला, न्यायालयात पोहोचला अन् मग पोलिसांना कानोसा लागला… आता पोलीस कोठडीची मागणी करणार

औरंगाबाद: मागील दहा दिवसांपासून एकावर एक गुन्हे करत सुसाट सुटलेला कुख्यात गुंड टिप्या मंगळवारी दुपारी थेट न्यायालयात (Aurangabad District court) येऊन धडकला. मात्र त्याच्या शोधात असलेले तीन-तीन पोलिसांच्या पथकाला, याची जराही कुणकुण लागली नव्हती, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 28 सप्टेंबर रोजी कुख्यात गुंड टिप्या उर्फ शेख जावेद शेख मकसूद थेट न्यायालयात हजर झाला. […]

Aurangabad Crime: फरार कुख्यात गुंड शहरात आला, न्यायालयात पोहोचला अन् मग पोलिसांना कानोसा लागला... आता पोलीस कोठडीची मागणी करणार
गेल्या काही दिवसांपासून फरार गुंड टिप्या अखेर मंगळवारी स्वतः न्यायालयात हजर झाला.
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 29, 2021 | 11:18 AM
Share

औरंगाबाद: मागील दहा दिवसांपासून एकावर एक गुन्हे करत सुसाट सुटलेला कुख्यात गुंड टिप्या मंगळवारी दुपारी थेट न्यायालयात (Aurangabad District court) येऊन धडकला. मात्र त्याच्या शोधात असलेले तीन-तीन पोलिसांच्या पथकाला, याची जराही कुणकुण लागली नव्हती, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 28 सप्टेंबर रोजी कुख्यात गुंड टिप्या उर्फ शेख जावेद शेख मकसूद थेट न्यायालयात हजर झाला. पोलिसांनी (Aurangabad Police) त्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवला होता. त्यामुळे घाबरून तो शरण आल्याचे म्हटले जात आहे. 17 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवाजी नगर भाजीमंडईमध्ये एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सीताराम केदारे (Sitaram Kedare) एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेले असताना टिप्याने या परिसरात त्यांच्यासह आणखी एका महिलेच्या अंगावर चारचाकी घालून त्यांचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. फरार होण्यासाठी एका कारागृह रक्षकाचे अपहरण करून त्यांच्याकडून दोन प्लॉट आणि एक लाख रुपये रक्कमही साथीदारांच्या मदतीने हडप करण्यात टिप्याचीच मदत होती. त्यानंतर पोलीस टिप्याचा कसून शोध घेत होते.

पोलिसांनी ‘बंदोबस्त’ करण्याचा दिला होता संदेश

मागील सहा दिवसांपासून पोलिसांनी टिप्याचे नातेवाईक, मित्रांची कसून चौकशी सुरु करून त्याची सर्व रसदच बंद केली होती. ‘तुम्ही त्याला हजर करा, नाही तर आम्हाला सापडल्यास काही खरे नाही’ असा संदेशच अप्रत्यक्षरित्या टिप्याच्या कुटुंबापर्यंत पोलिसांनी पोहोचवला होता. त्यानंतर टिप्या स्वतःहून आईसोबत न्यायालयात हजर झाल्याची माहिती मिळाली आहे.

घाबरल्याचे दाखवत थेट पोहोचला न्यायालयात

मंगळवारी दुपारी टिप्या दुचाकीवरून न्यायालयात हजर झाला. दुपारी बारा वाजता तो न्यायालयात आईसोबत बसला होता. याची माहिती कळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक न्यायालयात पोहोचले. त्यानंतर टिप्याच्या दोन बहिणी, पुंडलिकनगर पोलिसांचे पथक पोहोचले. इतर गुन्ह्यांत अडकवण्याची भीती वाटल्याने घाबरून टिप्याने शरणागती पत्करली, असे वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. बुधवारी पुंडलिक नगर पोलीस खुनाच्या प्रयत्नात, तर एमआयडीसी सिडको पोलीस अपहरण व लूटमारीच्या गुन्ह्यात त्याच्या स्वतंत्र पोलीस कोठडीची मागणी करतील.

पोलिसांना चुकवून थेट न्यायालयात कसा पोहोचला?

गेल्या काही दिवसांपासून टिप्याच्या मागवर असलेल्या पोलिसांना तो कुठे असेल, याची थोडीफार माहिती होती. स्थानिक गुन्हे शाळा, पुंडलिकनगर पोलीस टिप्याच्या मागावरच होते. तो शरण येण्याचीही कुणकुण पोलिसांना होती. त्यानुसार त्यांनी तयारी केली असती तर न्यायालयात हजर होण्यापूर्वीच त्याला पकडता आले असते. टिप्या मालेगावहून औरंगाबादेत पहाटे किंवा सकाळी दुचाकीवरून आला. दुपारी बारा वाजता तो न्यायालयात पोहोचेपर्यंत पोलिसांना माहिती नव्हती, असे सांगण्यात आले. मात्र या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण आहे. (Aurangabad’s criminal Tipya finally appeared in court himself, police had been searching for the last ten days)

इतर बातम्या- 

Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

Aurangabad crime: सातारा परिसरात दिवसाढवळ्या घरं फोडली, लोको पायलट आणि इंजिनिअरच्या घरात चोरी, सीसीटीव्हीत चोरटे कैद

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल