AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rameswaram Cafe blast : NIA ची मोठी Action, रामेश्वरम कॅफे ब्लास्टमध्ये थेट मास्टरमाईंडला उचललं

Rameswaram Cafe blast : मागच्या महिन्यात देशाला पुन्हा एकदा बॉम्ब स्फोटाच्या घटनेने हादरवून सोडलं होतं. 1 मार्चला रामेश्वरम कॅफेमध्ये शक्तीशाली ब्लास्ट झाला होता. या प्रकरणात NIA ला महत्त्वपूर्ण यश मिळालय. NIA कडून स्टेटमेंट जारी करुन ही माहिती देण्यात आलीय.

Rameswaram Cafe blast : NIA ची मोठी Action, रामेश्वरम कॅफे ब्लास्टमध्ये थेट मास्टरमाईंडला उचललं
Rameswaram Cafe blast caseImage Credit source: PTI
| Updated on: Apr 12, 2024 | 11:53 AM
Share

रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणात NIA ला महत्त्वपूर्ण यश मिळालय. राष्ट्रीय तपास यंत्रणेने पश्चिम बंगाल कोलकाता येथून शुक्रवारी दोघांना ताब्यात घेतलं. यात एक मास्टरमाईंड आहे. मुसावीर हुसैन शाहजीब असं एका आरोपीच नाव आहे. कॅफेमध्ये त्याने IED स्फोटक ठेवली होती. अब्दुल मतीन ताहा दुसऱ्या आरोपीच नाव आहे. तो रामेश्वर कॅफे ब्लास्ट प्रकरणाचा मुख्य मास्टरमाईंड आहे. त्याने सर्व आखणी करुन अमलबजावणी केली. NIA कडून स्टेटमेंटमध्ये ही माहिती देण्यात आलीय.

एनआयएने शुक्रवारी पहाटे फरार आरोपींना कोलकाता येथून ताब्यात घेतलं. खोटी ओळख दाखवून ते तिथे राहत होते. “केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, पश्चिम बंगाल, तेलंगण, कर्नाटक आणि केरळ या राज्य पोलीस यंत्रणांच्या उत्तम समन्वयामुळे आरोपींना शोधून पकडणं शक्य झालं” असं एनआयएने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. मुसावीर हुसैन शाहजीब याने कॅफेमध्ये IED ठेवले होते. अब्दुल मतीन ताहाची त्याच्यामागे प्लानिंग होती.

किती लाखांच होतं बक्षीस?

बंगळुरु रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यांसाठी NIA ने 10 लाख रुपयांच बक्षीस ठेवलं होतं. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवणार असल्याचही एनआयएकडून सांगण्यात आलं होतं. रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला फोटो एजन्सीने प्रसिद्ध केला होता. आरोपीने कॅप, काळी पँट आणि काळ्या रंगाचे शूज घातल्याच फोटोमध्ये दिसत होतं.

कधी झालेला स्फोट?

रामेश्वरम कॅफेमध्ये 1मार्चला बॉम्बस्फोट झाला होता. 3 मार्चला या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला. बंगळुरुच्या व्हाइटफिल्ड एरियामध्ये हा कॅफे आहे. या स्फोटात अनेकजण जखमी झाले होते. दुपारी लंचच्यावेळी हा स्फोट झाला होता.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.