खिडकी तोडून दरोडेखोर बँकेत, रात्री 11:53 ला सायरन वाजला, पहाटे 2:46 पर्यंत काय काय घडलं?

परसोडी/नाग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत रात्री 11:53 वाजता दोन अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला. (Bhandara Bank Robbery Plan unsuccessful)

खिडकी तोडून दरोडेखोर बँकेत, रात्री 11:53 ला सायरन वाजला, पहाटे 2:46 पर्यंत काय काय घडलं?
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न

भंडारा : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. लोखंडी खिडकी तोडून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. मात्र सायरनच्या आवाजामुळे केवळ संगणक मॉडेम चोरुन दरोडेखोर पसार झाले आणि दरोड्याचा प्रयत्न फसला. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात परसोडी/नागमध्ये हा प्रकार घडला. अज्ञाताविरोधात लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Bhandara Bank Robbery Plan unsuccessful)

दरोडेखोरांच्या प्रवेशानंतर सायरनचा आवाज

परसोडी/नाग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत रात्री 11:53 वाजता दोन अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला. बँकेत दरोडा टाकण्याच्या हेतूने खिडकी तोडून दोघं बँकेत शिरले. दरोडेखोरांनी शाखा व्यवस्थापकाच्या कक्षात प्रवेश केल्याने लगेच सायरन वाजले.

अडीच तासानंतर केवळ संगणक मॉडेमसह पसार

सायरनच्या आवाजाने घाबरुन दरोडेखोरांनी बँकेतील संगणक मॉडेम निकामी केले. मॉडेम निकामी करुन बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने तब्बल अडीच तासानंतर त्यांना निराश होऊन परतावे लागले.

पहाटे 2:46 वाजण्याच्या सुमारास दोन्ही दरोडेखोर घटनास्थळावरुन पसार झाले. दरोड्याचा संपूर्ण प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा दरोडा दोन अज्ञात चोरट्यांनी टाकल्याचे बोलले जात आहे.

अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा

दरम्यान, या घटनेची माहिती सकाळी नागरिकांसह बँक कर्मचाऱ्यांना मिळताच तात्काळ लाखांदूर पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी अज्ञात दरोडेखोरांनी केवळ संगणक मॉडेम चोरल्याचे आढळून आल्याने अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास येथील लाखांदूर पोलिस करत आहेत.

चोरी अहमदनगरमध्ये सोन्याची विक्री बीडमध्ये

दरम्यान, अहमदनगरमध्ये भरदिवसा दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लुटणाऱ्या दोघांना गेल्याच आठवड्यात बीडमधून जेरबंद करण्यात आलं. अहमदनगरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. दोघांना बीड जिल्ह्यातील शिरुरमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. भगवान भोसले आणि रामा इंगळे अशी  दोन्ही आरोपींची नावं आहेत.

संबंधित बातम्या :

कल्याणमध्ये चप्पलचं दुकान जळून खाक, 6 दिवसानंतर साफसफाई करताना लहान मुलांचा मृतदेह सापडल्याने खळबळ

गजा मारणे पाठोपाठ गुंड शरद मोहोळच्या मुसक्या आवळल्या, पुण्यात येण्यास बंदी

(Bhandara Bank Robbery Plan unsuccessful)

Published On - 9:57 am, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI