Bhandara Crime : पत्नीला संपवून फरार झाला, पोलिसांनी शोध घेतला असता वेगळंच सत्य समोर, भंडाऱ्यात नेमकं काय घडलं?

पती-पत्नीमध्ये दररोज वाद व्हायचे. एक दिवस हा वाद विकोपाला गेला आणि अनर्थ घडला. प्रकरणाचा तपास करताना धक्कदायक बाब समोर आली आणि गावात खळबळ माजली.

Bhandara Crime : पत्नीला संपवून फरार झाला, पोलिसांनी शोध घेतला असता वेगळंच सत्य समोर, भंडाऱ्यात नेमकं काय घडलं?
घरगुती वादातून पत्नीची हत्या करत पतीने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 10:30 AM

भंडारा / 31 ऑगस्ट 2023 : भंडाऱ्यात हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. काही ना काही कारणातून हत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. लाखनी तालुक्तात हत्येचे प्रकरण उघडकीस आलं आहे. घरगुती भांडणातून पतीने बायकोच्या डोक्यात पाट घालून हत्या केल्याची घटना घडली. पत्नीच्या हत्येनंतर नवऱ्यानेही कालव्यात उडी घेतली. लाखनी तालुक्यातील सिलोटी या गावात घटना घडली आहे. भारती चाचेरे आणि भारत चाचेरे अशी मयत पती-पत्नीची नावं आहेत. याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात हत्या आणि आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

लाखनी तालुक्यातील सिलोटी गावात भारत चाचेरे आणि भारती चाचेरे हे दाम्पत्या आपल्या दोन मुलांसह राहते. भारत चाचेरे मजुरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणातून नेहमी वाद व्हायचे. बुधवारी नेहमीप्रमाणे पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला अन् पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला.

पतीचा शोध घेतला तर…

दरम्यान, हत्येची घटना उघड होताच लाखनी पोलिसांनी माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी फरार पतीचा शोध सुरु केला. पतीचा शोध घेत असतानाच गावातील कालव्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. यानंतर पतीच्या आत्महत्येची बाब उघडकीस आली.

हे सुद्धा वाचा

एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी बारावीत शिकत आहे तर मुलगा दहावीत आहे. आई-वडिलांच्या भांडणात दोन मुलं अनाथ झाली आहेत. याप्रकरणी लाखनी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'.
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार.
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन.
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'.
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.