Nashik Crime : जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात तरुणावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
मित्रांसोबत डेअरीवर गेलेला तरुण थेट रुग्णालयात पोहचला. भररस्त्यात तरुणासोबत जे झालं त्याने नाशिक हादरले. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
![Nashik Crime : जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात तरुणावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद Nashik Crime : जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात तरुणावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/WhatsApp-Image-2023-08-31-at-8.49.30-AM.jpeg?w=1280)
मालेगाव / 31 ऑगस्ट 2023 : जुन्या वादातून भररस्त्यात तरुणावर चॉपरने हल्ला केल्याची घटना मालेगावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात तीन संशियतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मालेगाव भायगाव येथील संविधान नगरमध्ये ही घटना घडली. सुमित उद्धव तरवडे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात सुमित जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, समस्त लाड शाखीय वाणी समाजातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना निवेदन देऊन, कलम 307 लावून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
साजिद नावाच्या मुलाने 15 ऑगस्ट रोजी टिपू सुलतानचे स्टेटस ठेवला होता. याबाबत सुमितने असा स्टेटस का ठेवला अशी साजिदला विचारणा केली. याचा साजिदच्या मित्राला राग आल्याने राग आल्याने त्याने सुमितवर हल्ला केला. सुमित तरवडे हा त्याचे दोन मित्र रविंद्र भावसान आणि ललित तुषार पवार यांच्यासोबत बाईकवरुन संविधान नगर येथील डेअरीवर गेला होता.
यावेळी एक तरुण स्कूटीवरुन आला. त्याने आधी स्कूटीला धडक दिली. त्याने सुमित कोण आहे? सुमित कोण आहे? असे ओरडून सुमितकडे येऊन का रे तू जास्त करतो का? तू त्या साजिदचे नाव का घेतले? असे म्हणत त्यातील एका संशयित तरुणाने शिवीगाळ करत सुमितवर चोपरने हल्ला केला. तसेच तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, तुला मारून टाकू अशी सुमितला धमकी दिली. या प्रकरणी संशयित तीन जणांवर वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.