Thane Crime : उल्हासनगरात तरुणाची दादागिरी, फुकट चहा दिला नाही म्हणून हॉटेल मालकालाच…

हल्ली कोण कुणाला कोणत्या कारणातून मारहाण करेल सांगू शकत नाही. दुकानदार, हॉटेल मालकांना मारहाणीच्या घटनाही वाढल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

Thane Crime : उल्हासनगरात तरुणाची दादागिरी, फुकट चहा दिला नाही म्हणून हॉटेल मालकालाच...
उल्हासनगरमध्ये हॉटेल मालकाला मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 8:18 AM

उल्हासनगर / 31 ऑगस्ट 2023 : ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. क्षुल्लक कारणातून मारहाणीच्या घटना तर सतत घडत आहेत. अशीच एक घटना उल्हासनगरात उघडकीस आली आहे. फुकट चहा दिला नाही म्हणून एका तरुणाने हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये घडली आहे. मारहाणीची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिट्टू असे मुख्य आरोपीचे नाव आहे, तर अज्जू सचदेव असे मारहाण झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्यापारी वर्गात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

काय घडलं नेमकं?

उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये खट्टनमल चौकात कन्हैया चहा नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आरोपी बिट्टू हा चहा पिण्यासाठी आला. त्याने हॉटेल मालक करण सचदेव यांना मला फुकट चहा पाहिजे असे सांगितले. मालक करण सचदेव याने फुकट चहा देण्यास नकार दिला. यानंतर बिट्टू निघून गेला. मात्र काही पुन्हा दोन साथीदारांना घेऊन हॉटेलमध्ये आला. यावेळी करण यांचा भाऊ अज्जू सचदेव हा काऊंटरवर बसला होता.

आरोपीने अज्जूला घडलेली घटना सांगितली, मात्र अज्जूनेही फुकट चहा देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या बिट्टूने दोन साथीदारांसह अज्जूला बेदम मारहाण केली. ही मारहाणीची हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर सचदेव यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. सचदेव यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.