Vasai Crime : जुन्या वादातून तरुणाला संपवले अन् फरार झाला, आठ वर्षे पोलिसांना गुंगारा दिला, पण…

आरोपी कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा वसईतील एका हत्या प्रकरात आला आहे. आठ वर्षांपासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.

Vasai Crime : जुन्या वादातून तरुणाला संपवले अन् फरार झाला, आठ वर्षे पोलिसांना गुंगारा दिला, पण...
आठ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 9:09 AM

वसई / 30 ऑगस्ट 2023 : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांना अधिक काळ फसवू शकत नाही. अखेर तो पकडला जातोच. अशीच एक घटना वसईत घडली आहे. आठ वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यास पोलिसांनी यश आले आहे. गुन्हेगाराच्या हातावरील टॅटूवरुन पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि अखेर त्याला बेड्या ठोकल्या. शिवबाबू उर्फ शिवा भैय्या जगतपाल निषाद असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. वसई क्राईम ब्रँच युनिट 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहूराज रणविरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे यांच्यासह सर्व टीमने ही कामगिपृरी केली.

काय आहे प्रकरण?

आरोपी शिवाभय्या आणि त्याच्या इतर साथीदारांनी 17 मार्च 2016 रोजी नालासोपारा पूर्व वलईपाडा परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून सुभाषचंद्र उर्फ भालू रामाशंकर गुप्ता या 21 वर्षीय तरुणाची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून अज्ञात ठिकाणी फेकून सर्व आरोपी फरार झाले होते. याबाबत तुळिंज पोलीस ठाण्यात भादवी 302, 404, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

‘असा’ घेतला आरोपीचा शोध

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील विविध गंभीर गुन्ह्यातील पाहिजे, फरार आणि निष्पन्न आरोपींचा शोध घेऊन, त्यांना अटक करण्याच्या सूचना सर्व क्राईम ब्रँच आणि पोलीस ठाण्याला मिळाल्या होत्या. त्यानुसार हा गुन्हा निकाली काढण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशावरून वसई क्राईम ब्रँच टीम 03 च्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांना आरोपीचा एक अस्पष्ट फोटो मिळाला. या फोटोत आरोपीच्या हातावर टॅटू असल्याचे दिसले. या टॅटूवरुन पोलिसांनी आरोपीचा छडा लावला.

हे सुद्धा वाचा

आरोपी उत्तर प्रदेशातील आपल्या गावी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यातील तीन आरोपींना आधीच अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी फरार होता. आठ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याला पकडलेच.

Non Stop LIVE Update
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.