Bhopla Crime : बहिणीला प्रियकरासोबत स्कुटीवर पाहिलं, भावाच्या तळपायाची आग मस्तकात, अन् भावानं रचला भीषण कट

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधून सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. बहिणीला प्रियकरासोबत स्कुटीवरुन चालताना पाहून भावाला इतका राग आला की त्याने दोघांनाही ठार मारण्यासाठी मुद्दाम वाहनाला धडक दिली. त्यानंतर नेमकं काय झालं वाचा...

Bhopla Crime : बहिणीला प्रियकरासोबत स्कुटीवर पाहिलं, भावाच्या तळपायाची आग मस्तकात, अन् भावानं रचला भीषण कट
भावाकडून बहिणीच्या प्रियकराला मारण्याचा कटImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 3:08 PM

दिल्ली : मध्य प्रदेशची (MP) राजधानी असलेल्या भोपाळमधून (Bhopla) एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. बहिणीला (Sister) प्रियकरासोबत स्कुटीवरुन चालताना पाहून भावाला इतका राग आला की त्याने दोघांनाही ठार मारण्यासाठी मुद्दाम वाहनाला धडक दिली. भोपाळमधून ऑनर किलिंगच्या प्रयत्नाचे असे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. की तुम्ही पाहून थक्क व्हाल. एका बहिणीचे तिच्या प्रयकरासोबत चालणे भावाला इतके वैतागले की त्याने त्या दोघांना रस्त्यावरच मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार इतका धक्कादायक आहे की तुम्हाला देखील ही घटना पाहून लक्षात येईल की डोक्यात राग गेला की कशा प्रकारचं कृत्य होऊ शकतं. तेही आपल्या एकाच रक्तच्या नात्यासोबत. एका भावानेच आपल्या बहिणीला अद्दल घडवण्यासाठी केलेला हा धक्कादायक प्रकार भयानक आहे.

नेमकं काय घडलं?

हत्येचा हा प्रयत्न उघडकीस आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भावाने सामान घेऊन जाणाऱ्या जादुई वाहनातून बहिणीची आणि तिच्या प्रियकराच्याच स्कुटीचा कसा पाटलाग केला आणि त्यानंतर त्यांना जाणूनबुजून धडक दिल्याचे दिसून येत आहे. यानंतर दोघेही रस्त्यावर पडून बचावले तेव्हा भावाने चालकासह कारमधून खाली उतरून प्रियकराला मारहाण केली. त्यात तो जबर जखमी झाला. या भावाने प्रियकराला इतकी मारहाण केली की त्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. रस्त्यावर लोक असताना देखील या भावाने त्या तरुणाला मारहाण करणं थांबवलं नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचे यावेळी तिनतेरा वाजल्याचं दिसून आलं.

भावाला अटक

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरोपी भाऊ आणि ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे. भोपाळमधील बहिणीला प्रियकरासोबत फिरत असल्याचे पाहून भावाने दोघांची हत्या करण्याचा कट रचला होता. याप्रकरणी अयोध्यानगर पोलिस ठाण्याचे प्रभारी नीलेश अवस्थी यांनी सांगितलं की, सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. एक मुलगा आपल्या मैत्रिणीसोबत स्कुटीवरुन चालला असताना मुलीच्या भावाने दोघांना पाहिले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केली. मुलाने स्कुटीचा वेग वाढवला त्यानंतर स्कुटीला भावाने धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडले. यानंतर मुलीच्या भावाने बहिणीला आणि तिच्या प्रियकराला मारहाण केली. याप्रकरणी भावाला अटक करण्यात आली आहे.

इतर बातम्या

Aurangabad | अश्लील व्हिडिओ करणारा कीर्तनकार पोलिसांच्या जाळ्यात, औरंगाबादेत महिलेसोबतचा व्हिडिओ होता चर्चेत!

Marathi Sahitya Sammelan: ‘उद्घाटक म्हणूस स्वागत पण भोंग्यावरही बोला’ ‘आप’ने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात दडलंय काय?

Pune fire incident : पुण्याच्या खराडीत फर्निचरच्या दुकानांना लागलेली आग तासाभरानंतर आटोक्यात, बारा दुकानं खाक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.