CCTV Video : ‘गॅग्स ऑफ वास्सेपूर स्टाईल’ गोळीबाराने खळबळ! भाजीविक्रेत्याच्या मुलीवर गोळीबार, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद!

Bihar Crime News : बिहारमध्ये एका मुलीवर गोळीबार करण्यात आला होता. बुधवारी ही घटना घडली होती. बिहारच्या पाटणामध्ये असलेल्या बेऊस पीएस येथील सिपरा परिसरात हा गोळीबार करण्यात आला होता.

CCTV Video : 'गॅग्स ऑफ वास्सेपूर स्टाईल' गोळीबाराने खळबळ! भाजीविक्रेत्याच्या मुलीवर गोळीबार, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद!
थरारक गोळीबार...
Image Credit source: Twitter Video Grab
सिद्धेश सावंत

|

Aug 18, 2022 | 11:59 AM

तुम्ही जर गॅग्स ऑफ वास्सेपूर (Gangs of Wasseypur) पाहिला असेल तर त्यातला परपॅटीक्युलर तुम्हाला माहीत असेलच. शाळेत असणारा हा मुलगा बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करायचा, असा प्रसंग आहे. पिशवीतून घेऊन दुकानात जायचा, पिशवीतून भाजी काढवी, तशी तो बंदूक काढायचा आणि दुकानदारावर ताणून लुटमार करायचा, असा किस्सा सिनेमात आहे. दरम्यान, आता बिहारमधून (Bihar Crime News) समोर आलेल्या एका घटनेत एका तरुणाने परपॅटीक्युलरप्रमाणेच पिशवीतून बंदूक आणली होती. पिशवी घेऊन हा तरुण एके ठिकाणी येतो. थांबतो. मागून एक मुलगी येते. ती तरुणाला क्रॉस करुन पुढे जाते. इतक्यात तरुण पिशवीत पटकन बंदूक काढतो. मुलीवर ताणतो आणि ट्रिगरही दाबतो. मुलीला गोळी लागते. ती जागच्या जागी कोसळते. पण तोपर्यंत गोळीबार करणारा तरुण तिथून पळून गेलेला असतो. रस्त्याच्या आडवाटेला ही घटना घडते. फारशी वर्दळही नसते. आपल्याला कुणीच पाहणार नाही, असा विश्वास बाळगून तरुण मुलीवर गोळी झाडतो. पण शेजारी असलेल्या दुकानात सीसीटीव्ही लागलेला आहे आणि तो सीसीटीव्ही (Bihar firing cctv video) सुरु आहे, आपली प्रत्येक हालचाल त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतेय, याची पुसटशी जाणीवही या तरुणाला नसते. ही थरारक घटना आता समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय.

पाहा व्हिडीओ :

नेमकी काय घटना?

बिहारमध्ये एका मुलीवर गोळीबार करण्यात आला होता. बुधवारी ही घटना घडली होती. बिहारच्या पाटणामध्ये असलेल्या बेऊस पीएस येथील सिपरा परिसरात हा गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एक तरुणीच गंभीर जखणी झाली होती. तरुणीच्या मानेला गोळी लागली असून या तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीस तपास सुरु

प्रेमप्रकरणातून एका तरुणाने सामान्य भाजी विक्रेत्याच्या मुलीवर गोळीबार केला असल्याचा संशय़ पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिलीय. या घटनेचं हादरवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. दिवसाढवळ्या गोळीबाराची ही घटना घडल्यानं पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असाही सवाल उपस्थित केला जातोय.

हे सुद्धा वाचा

आता पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुढील तपास केला जातो आहे. मात्र या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. सध्या या मुलीची प्रकृती नाजूक असून तिच्यावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने उफचार केले जात आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें