बापरे! तत्काळ तिकिटाच्या लाईनमध्ये घुसल्यावरुन राडा, तिकीट काऊंटरसमोर थेट गोळीच घातली, कुठे घडला प्रकार?

सिद्धेश सावंत

|

Updated on: Nov 28, 2022 | 8:22 AM

तत्काळ तिकीट काढण्यासाठी लाईनमध्ये काही जण उभे, अचानक गोळीबारानं उडाली एकच खळबळ

बापरे! तत्काळ तिकिटाच्या लाईनमध्ये घुसल्यावरुन राडा, तिकीट काऊंटरसमोर थेट गोळीच घातली, कुठे घडला प्रकार?
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9 Marathi

बिहार : पाटणा येथील बिहटा रेल्वे स्थानकात एक विचित्र घटना घडली. तिकीटाच्या लाईनमध्ये असताना एका तरुणावर किरकोळ वादातून थेट गोळीबार करण्यात आला. यात तरुण गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबार झाल्याचं कळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण हे सगळं करेपर्यंत गोळीबार करणारा आरोपी फरार झाला होता. आता आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय.

नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारी बिहटा रेल्वे स्थानकातील रिझर्वेशन काऊंटरवर तिकीट काढण्यासाठी मोठी रांग लागली होती. तत्काळ तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अनेक लोकं रांगेत उभे होते. इतक्यात एक तरुण रांग तोडून मध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला होता.

ही बाब लक्षात आल्यानंतर मागे उभ्या असलेल्या तरुणाने त्याला हटकलं. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीदरम्यान रांगेत मध्ये घुसलेल्या तरुणाने थेट बंदूकच काढली आणि हटकणाऱ्या तरुणावर गोळी झाडली. यानंतर तरुण घटनास्थळावरुन पसार झाला.

या घटनेत गोळी लागून तरुण जागेवरच कोसळला. गोळीबाराच्या आवाजानं तिकीट काऊंटरचा परिसर हादरुन गेला. लोकं सैरावैरा पळू लागले. इतक्यात जीआरपी आणि आरपीएफच्या पथकानं परिस्थिती नियंत्रणात आणली.

गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. पण गर्दीचा फायदा उचलून आरोपीने पळ काढला असावा, असा पोलिसांना संशय आहे. तर जखमी तरुणाचं नाव मुदरीश खान असून त्याचं वय 25 वर्ष आहे.

जखमी तरुणाला पोलिसांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केलंय. सध्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे .पण जखमी तरुणाचा जबाब नोंदवण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास केला जातोय.

तत्काळ तिकीट काढण्यासाठी लोक रातोरात येऊन तिकीट खिडकीजवळ रांग लावतात. तिकीटासाठी खिडकी उघडल्यानंतरही सुरुवातीच्या दोन तीन मिनिटांतच सगळी तिकीटं संपून जातात. अशावेळी भांडण होणं हे नेहमीचच झालंय. पण एखाद्यावर जीवघेणा हल्ला करण्यासारखा प्रकार तिकिटाच्या रांगेत घडल्यानं एकच खळबळ उडालीय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI