AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाचा नजरेत भरला, काकीने त्यालाच जोडीदार बनवलं, नवरा बोलला, 6 दिवसापूर्वीच माझ्यासोबत….

एक धक्कादायक हैराण करणारं प्रेम प्रकरण समोर आलय. पतीला सात जन्म साथ निभावण्याच वचन देत सात फेरे घेणारी महिला पलटली. महत्त्वाच म्हणजे नात्यात लागणारा भाचाच तिच्या नजरेत भरला. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे.

भाचा नजरेत भरला, काकीने त्यालाच जोडीदार बनवलं, नवरा बोलला, 6 दिवसापूर्वीच माझ्यासोबत....
Aunt love NephewImage Credit source: Representative Image
| Updated on: Jun 21, 2025 | 2:20 PM
Share

प्रेम कधीही, कुठेही आणि कोणावरही होऊ शकतं. हे कोणाच्या हातात नाही, असं तुम्ही ऐकलं असेल. बिहारच्या जुमईमध्ये तर हद्द पार झाली. एका विवाहित महिला आपल्या भाच्याचा प्रेमात पडली. दोघे लपून-छपून भेटू लागले. पतीला याबद्दल कळताच विषय पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. खूप गोंधळ झाला. पोलिसांनी समज दिल्यानंतर पत्नी पतीसोबत परतली. पण सहा दिवसापूर्वीच ती घरातून पळून गेली. ही घटना टाऊन पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. आठ वर्षांपूर्वी आयुषी आणि विशालच लग्न झालं. लग्नानंतर एक मुलगी झाली. दोघांमध्ये चांगलं नातं होतं. दोन वर्षांपूर्वी महिलेच्या आयुष्यात गावातीलच एका युवकाची एन्ट्री झाली. गावातील हा युवक नात्यात महिलेच्या नवऱ्याचा दूरचा भाचा लागत होता. दोघांमध्ये तासनतास बोलणं व्हायल लागलं.

आयुषी भाचा सचिन सोबत राहण्याचा हट्ट करु लागली. या प्रकरणी महिला पोलीस ठाण्यात पतीने अर्ज दिला. त्या आधारावर दोघांना बोलवून चर्चा करण्यात आली. असं वाटलं की आता सर्वकाही ठीक होईल. या दरम्यान पती आणि प्रियकरामध्ये जोरदार भांडण झालं. आयुषी सचिनला भेटायची. अखेर सहा दिवसांपूर्वी आयुषी घर सोडून सचिनसोबत पळून गेली.

रात्री ती गायब झाली

पती विशालने या प्रकरणी टाऊन पोलीस ठाण्यात सचिनच्या विरोधात शस्त्राच्या धाकावर पत्नीच अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. ‘6 दिवसांपूर्वी ती माझ्यासोबत होती. रात्री ती गायब झाली’ असं विशाल म्हणाला. अपहरणाचा आरोप सचिनवर लागला. पोलिसांवर दबाव वाढल्यानंतर सचिन आणि आयुषीने न्यायालयात आत्मसमर्पण केले. दोघांच स्टेटमेंट नोंदवण्यात आलं. आयुषी सचिनसोबत रहायला तयार झाली. मुलगी पिता विशाल दुबे यांच्याकडे आहे. आयुषीने कोर्टात स्टेटमेंट दिल्यानंतर गावातच शिव मंदिरात सचिनसोबत लग्न केलं. सचिन आणि आयुषीच्या या नात्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. अखेर सचिनला आयुषीसोबत राहत घर सोडावं लागलं. दोघे आता कुठे दुसऱ्याठिकाणी रहातयात.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.