Terrible Crime: व्यापाऱ्याला मारली गोळी, शीर धडापासून वेगळे करुन ते हातात घेऊन फिरत राहिला; BJP नेत्याचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही हादरले

आरोपी भाजप कार्यकर्त्याने आपल्या मित्राला पहिल्यांदा गोळी मारली. त्यानंतर त्याचे शीर त्याने धडापासून वेगळे केले. धड फेकून दिले आणि त्याचे शिर सोबत घेऊन ते नाहीसे करण्यासाठी, तो कारमधून शहरात फिरत राहिला. याच वेळी त्याला पोलिसांनी अटक केली.

Terrible Crime: व्यापाऱ्याला मारली गोळी, शीर धडापासून वेगळे करुन ते हातात घेऊन फिरत राहिला; BJP नेत्याचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही हादरले
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 6:21 PM

आग्रा : एका भाजपा कार्यकर्त्याने( BJP leader ) केले कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत.  उ. प्रदेशात आगरा(Agra) येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी भाजप कार्यकर्त्याने आपल्या मित्राला पहिल्यांदा गोळी मारली. त्यानंतर त्याचे शीर त्याने धडापासून वेगळे केले. धड फेकून दिले आणि त्याचे शिर सोबत घेऊन ते नाहीसे करण्यासाठी, तो कारमधून शहरात फिरत राहिला. याच वेळी त्याला पोलिसांनी अटक केली. या निर्घृण हत्याकांडात त्याचा एक साथीदारही सहभागी होता. पोलिसांनी आता हत्येच्या आरोपात या दोघांनाही अटक केली आहे. या हत्येमागचे कारण काय आहे, याचा तपास आता पोलीस करीत आहेत. हत्या करणारा आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही भाजपाचे कार्यकर्ते होते, असे सांगण्यात येते आहे.

पहाटे उघडकीस आला प्रकार

घटना आगराजवळील अरसेना गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास त्यांना जंगलात एक कार उभी असलेली दिसली. एक तरुण या कारच्या बाहेर उभा होता. जेव्हा पोलीस त्या कारच्या जवळ पोहचले तेव्हा त्यांना केवळ एका मृतदेहाचे धड पडलेले दिसले. गाडीत पुढच्या सीटवर एक दुसरा तरुणही बसलेला होता. जेव्हा पोलिसांनी कारच्या मागच्या बाजूला डोकावले तेव्हा त्यांना धक्काच बसला. गाडीत मागच्या सीटवर मृतदेहाचे शीर ठेवलेले होते. पोलिसांनी तातडीने या दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत समजले की मृत व्यक्तीचे नाव हे नितीन वर्मा आहे आणि तो चांदीचा व्यापारी होता. नितीन यांचे बंधू प्रवीण आणि अन्य कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली. गुरुवारी संध्याकाळी नितीन वर्मा हे बेलनगंजमध्ये राहणाऱ्या टिंकू भार्गवला भेटण्यासाठी गेले होते, तिथून ते परतलेच नाही.

अनुसूचित मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आरोपी

चांदी व्यापारी नितीन वर्मा यांचे घराच्या बाहेरच्या भागातच चांदीचे दुकान होते. वर्मा हे भाजपाच्या गोपेश्वर मंडळाचे उपाध्यक्षही होते. गुरुवारी संध्याकाळी फोन आला तेव्हा ते टिंकूसोबत असल्याची माहिती त्यांनी पत्नीला दिली होती. थोड्याच वेळात घरी परतणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. रात्री उशिरा जेव्हा नितीन यांना फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा फोन स्वीच ऑफ येत होता. टिंकूचा फोनही बंद येत होता. टिंकू भाजपाच्या अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती आहे.

पहिल्यांदा गोळी मारली मग शीर कापले

या हत्याकांडात टिंकू भार्गव आणि त्याचा साथीदार अनिल याला अटक करण्यात आलेली आहे. या दोघांनी पहिल्यांदा नितीन वर्मासोबत दारु प्यायली. त्यानंतर त्याची गोळी मारुन हत्या केली. त्यानंतर दोघांनी धारदार हत्याराने नितीन वर्मा यांचे शीर कापले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते प्रय़त्न करीत होते. टिंकू याने ओळखीच्या माणसाची कार त्यासाठी आणली होती. गाडीची नंबर प्लेटही बदलण्यात आली होती. सीसीटीव्हीत गाडी ओळखू येऊ नये यासठी नंबरप्लेट बदलण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.