AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News | 11 दिवसांपूर्वीच बाप बनलेला, 230 किलोमीटर प्रवास करुन गेला, बायकोला संपवलं, का?

Crime News | 11 दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिलेला, पण काळाच्या उदरात असं काही दडलय याची तिला कल्पनाच नव्हती. मुल जन्माला आल्यानंतर पती-पत्नी अधिक जवळ येतात. पण त्याच्या बाबतीत उलट घडलं. सकाळपर्यंत त्याने 150 फोन कॉल केले होते.

Crime News | 11 दिवसांपूर्वीच बाप बनलेला, 230 किलोमीटर प्रवास करुन गेला, बायकोला संपवलं, का?
Kishore married Pratibha last November
| Updated on: Nov 09, 2023 | 1:05 PM
Share

बंगळुरु : 11 दिवसापूर्वीच तो पिता बनलेला. आई-वडिल बनणं हा कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. खरंतर मुल जन्माला आल्यानंतर पती-पत्नी अधिक जवळ येतात. त्यांना जोडणारा दुवा आल्यामुळे त्यांच्यातील नात अधिक घट्ट होतं. पण त्याच्या बाबतीत उलट घडलं. कारण त्याच्या मनात संशयाच भूत बसलं होतं. पत्नीच दुसऱ्या कोणासोबत अफेअर चालूय हा संशय त्याच्या मनात होता. याच संशयापोटी तो 230 किलोमीटरचा प्रवास करुन पत्नीच्या गावी गेला. बाळंतपणासाठी पत्नी तिच्या माहेरी गेली होती. त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्याआधी त्याने किटकनाशक प्राशन केलं. त्याची प्रकृती गंभीर आहे. 11 दिवसांपूर्वीच बाळाच्या रुपाने या जोडप्याच्या आयुष्यात आनंद आला होता.

किशोर डी असं आरोपीच नाव आहे. तो कर्नाटक पोलीस दलात शिपाई होता. कर्नाटकच्या चामराजनगरमधून तो पत्नीच्या गावी होसकोटी येथे गेला. 230 किलोमीटरचा प्रवास करुन जाण्याआधी त्याने पत्नीला प्रतिभाला 150 फोन कॉल केले. तिने त्याच्या एकाही फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही. किशोरने प्रतिभाची हत्या करण्याआधी किटकनाशक प्राशन केलं. त्याची प्रकृती गंभीर आहे. किशोरला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ताब्यात घेऊ, असं पोलिसांनी सांगितलं. 13 नोव्हेंबर 2022 रोजी किशोर आणि प्रतिभाच लग्न झालं होतं.

दोघांच फोनवर सुरु असलेलं भांडण कोणी थांबवलं?

किशोर प्रतिभावर सतत संशय घ्यायचा. तिला आलेले फोन कॉल, मेसेज सारखे तपासत रहायचा. तिच्याशी कोण-कोण बोललं, त्या प्रत्येक माणसाबद्दल तो चौकशी करायचा. कॉलेजच्या दिवसातल्या पुरुष मित्रांसोबत तुझे अजूनही जवळचे संबंध आहेत, असा आरोप करायचा. पोलिसांनी ही माहिती दिली. रविवारी संध्याकाळी किशोरने प्रतिभाला फोन करुन तिला शिवीगाळ केली. प्रतिभाच्या आईनेमध्ये पडून दोघांच फोनवर सुरु असलेलं भांडण थांबवलं.

सकाळपर्यंत किती फोन कॉल केले?

प्रतिभाच्या आईने तिला फोन कॉलला उत्तर देऊ नकोस असं सांगितलं. तू तणाव घेतलास, तर बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होईल. म्हणून किशोरचे फोन न उचलण्याचा सल्ला दिला. सोमवारी सकाळी किशोरने 150 फोन कॉल केल्याच प्रतिभाच्या लक्षात आलं. तिने याबद्दल तिच्या पालकांना सांगितलं. सकाळी 11.30 च्या सुमारास किशोर प्रतिभाच्या घरी पोहोचला.

15 मिनिटांनी किशोर ओरडत रुमच्या बाहेर आला

एफआयआरनुसार, किशोरने आधी किटकनाशक प्राशन केलं. त्यानंतर त्याने प्रतिभा आणि बाळ ज्या खोलीत होते, त्या रुमचा दरवाजा बंद केला. त्याने ओढणीने गळा आवळून प्रतिभाची हत्या केली. प्रतिभाच्या आईला संशय आला म्हणून त्यांनी दरवाजा ठोठावला. पण कोणीच प्रतिसाद दिला नाही. 15 मिनिटांनी किशोर ओरडत रुमच्या बाहेर आला व तिथून पसार झाला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.