AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Woman Cricketer Death : काही दिवसांपासून बेपत्ता होती, मग महिला क्रिकेटरचा थेट मृतदेहच आढळला !

पुद्दुचेरी येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये 25 महिला सहभागी होणार होत्या. यासाठीच त्या टूर्नामेंटची तयारी करत होत्या. मात्र एक दिवस अचानक राजश्री बेपत्ता झाली. यानंतर तिच्या कोचने ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली.

Woman Cricketer Death : काही दिवसांपासून बेपत्ता होती, मग महिला क्रिकेटरचा थेट मृतदेहच आढळला !
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jan 14, 2023 | 8:18 PM
Share

कटक : काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला क्रिकेटरचा मृतदेह सापडल्याने ओडिसातील कटक शहरात एकच खळबळ माजली आहे. राजश्री स्वाई असे मयत महिला क्रिकेटरचे नाव आहे. राजश्री गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. राजश्रीच्या कोचने ती बेपत्ता झाल्याची तक्रारही कटक शहर पोलिसात नोंदवली होती. पोलीस अनेक दिवसापासून राजश्रीचा शोध घेत होते. मात्र ती कुठेच सापडत नव्हती. अखेर तिचा मृतदेह शहराजवळील घनदाट जंगलात आढळला. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. महिलेच्या घरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आगामी टूर्नामेंटची तयारी करत होती

पुद्दुचेरी येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये 25 महिला सहभागी होणार होत्या. यासाठीच त्या टूर्नामेंटची तयारी करत होत्या. मात्र एक दिवस अचानक राजश्री बेपत्ता झाली. यानंतर तिच्या कोचने ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली.

काही दिवसांपासून बेपत्ता होती

बराच शोध घेऊनही राजश्री सापडत नव्हती. अखेर काही दिवसांनी तिचा मृतदेह शहराजवळीस घनदाट जंगलात लटकलेल्या अवस्थेत आढळला. तसेच तिची स्कूटरही तेथेच पडलेली आढळली.

कुटुंबीयांचा राजश्रीच्या हत्येचा दावा

महिलेच्या शरीरावर मारल्याच्या जखमा होत्या. तसेच तिच्या एका डोळ्यालाही जखम झाली आहे. यावरुन तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप राजश्रीच्या घरच्यांनी केला आहे.

तपासाअंतीच मृत्यूचे खरे कारण कळेल

याप्रकरणी कटक शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. तपासाअंतीच राजश्रीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? आणि तिची हत्या झाली असेल तर कुणी आणि कोणत्या कारणातून केली? याचा उलगडा होईल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच