नोरा फतेही ते श्रद्धा कपूर ड्रग्ज पार्टीत? देश विदेशात पार्ट्या, कोणी केला बॉलिवूडला हादरवणारा खुलासा ?
दुबईतून प्रत्यार्पित ड्रग्ज तस्कर मोहम्मद सलीम शेखने मुंबईत धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि दाऊद इब्राहिमच्या कनेक्शनसह देशा-परदेशातील ड्रग्ज पार्ट्यांमध्ये त्याचा सहभाग उघड झाला आहे. अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींची नावे घेतली आहेत. मुंबई पोलीस आणि ईडी या प्रकरणी सखोल चौकशी करत असून अनेकांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्ती प्रकरणात हवा असलेला आणि इंटरपोलने ज्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती, तो कुख्यात ड्रग्ज तस्कर मोहम्मद सलीम मोहम्मद सोहेल शेख याचे दुबईहून प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याला मुंबईत औपचारिकपणे अटक करण्यात आली. आज त्याने दिलेल्या विशेष जबाबात बरेच धक्कादायक खुलासे केले आहे. तो देशात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित करतो आणि त्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठाही करतो, असं त्याच्या चौकशीत समोर आल्याचं सूत्रांनी सांगितले. जबाबात त्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांची, तसेच अनेक पक्षांच्या नेत्यांची नाव घेतली. तसेच निर्माते, दिग्दर्शक आणि रॅपर्ससह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींमधील संबंध आणि परदेशात आणि देशात ड्रग्ज पुरवठा आणि पार्ट्यांचा दावाही त्यान केला.
अनेक सेलिब्रिटींची नावं
दाऊदचा खास सलीम डोळा याचा साथीदार ड्रग सप्लायर मोहम्मद सलीम सुहैल शेखला दुबईतून डिपोर्ट करून आणण्यात आलं, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अँटी नार्कोटिक्सच्या तपासादरम्यान धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामध्ये चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातली अनेक व्यक्तींची नावे उघड झाली. हाय-प्रोफाइल ड्रग पार्ट्यांमध्ये अनेक बॉलिवूड स्टार आणि राजकीय व्यक्ती सहभागी होत असत, असा दावा त्याने केला. पोलीस तपासादरम्यान मोहम्मद सलीम सोहेल शेखने ज्या नावांचा उल्लेख केला आहे त्यात अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धांत कपूर, माजी आमदार झीशान सिद्दीकी, रॅपर लोका, चित्रपट निर्माता अब्बास-मस्तान, अलीशा पारकर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी उर्फ ओरहान अशा अनेकांच्या नावाचा त्यात समावेश आहे. अशा अनेक कलाकारांसमोबत, लोकांसोबत देशात आणि विदेशात ड्रग्स पार्टीचे आयोजन केल्याचा दावा त्याने केला. आरोपीने स्वतः त्यात भाग घेतला आणि ड्रग्ज पुरवले असाही दावा केला. त्याच्या धक्कादायक खुलाशामुळे मोठी खळबळ माजली आहे.
होणार सखोल चौकशी
मुंबई पोलिसांच्या अँटिक-नार्कोटिक्स सेल (एएनसी) ने एका मोठ्या देशव्यापी ड्रग्ज ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. त्याचे संचालन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोळा हा करत असल्याचं म्हटलं जात आहे. या ड्रग नेटवर्कने देशभरातील अनेक राज्यात मेफेड्रोन (एमसीएटी), म्याव म्याव आणि आइस सारख्या धोकादायक सिंथेटिक ड्रग्जचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर ड्रग्स पुरवठ्याची ही साखळी परदेशातही पसरली आहे. ऑगस्टमध्ये जेव्हा सलीम डोलाचा मुलगा ताहिर डोला याला यूएई मधून डिपोर्ट करण्यात आलं तेव्हा या रॅकेटचा खरा चेहरा उघड झाला. तसेच या तपासात असंही उघड झालं की ताहेरच्या ड्रग्ज पार्ट्या केवळ मुंबई किंवा गोव्यापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर दुबई आणि थायलंड मध्येही अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले होते. या प्रकरणाची आता मुंबई गुन्हे शाखा आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे
तपासात ज्या लोकांची नावे समोर आली आहेत त्यांचा इतर कोणत्याही ड्रग्ज तस्करांशी काही संबंध आहे की नाही याचीही चौकशी केली जाईल. यापूर्वी आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्ट्यांमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांचा सहभाग होता की नाही आणि जर असेल तर ते कसे सहभागी झाले होते याचीही चौकशी केली जाईल. वर उल्लेख केलेल्या लोकांनी या ड्रग्ज पार्ट्यांना कुठून आणि कसा पैसा दिला? असे अनेक प्रश्न समोर असून याची उत्तर मिळवण्यासाठी या सेलिब्रिटींची आणि इतर लोकांचीही चौकशी केली जाऊ शकते. या प्रकरणाची आता मुंबई गुन्हे शाखा आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित सर्व हाय-प्रोफाइल लोकांना बोलावून चौकशी केली जाईल, असे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे.
