राखी सावंत किसिंग प्रकरण, मिका सिंह विरोधात दाखल गुन्हा मुंबई हायकोर्टाकडून रद्द

गेली 17 वर्षे बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरलेला राखी सावंत चुंबनप्रकरणी मुंबई हायकोर्टाने आज अखेर निकाल दिला आहे. मुंबई हायकोर्टाने गायक मिका सिंगला मोठा दिलासा दिला आहे.

राखी सावंत किसिंग प्रकरण, मिका सिंह विरोधात दाखल गुन्हा मुंबई हायकोर्टाकडून रद्द
चुंबन प्रकरणी मिका सिंगला मुंबई हायकोर्टाला दिलासाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 4:33 PM

मुंबई : राखी सावंत चुंबन प्रकरणात अडचणीत सापडलेल्या गायक मिका सिंगला अखेर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राखी सावंतचे 17 वर्षांपूर्वी जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप मिका सिंगवर होता. मागील 17 वर्षे या आरोपाला सामोरे गेलेल्या मिका सिंगविरोधातील एफआयआर रद्द करण्यास अभिनेत्री राखी सावंत हिनेही सहमती दर्शवली होती. सामोपचाराने एफआयआर रद्द करण्यास राखी तयार झाली. त्यानंतर आज न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गुन्हा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय देत मिका सिंगला आरोपमुक्त केले. हे चुंबन प्रकरण मागील 17 वर्षे बॉलीवूड विश्वात चर्चेचा विषय राहिले होते. प्रदीर्घ कालावधीनंतर याप्रकरणी आज पडदा पडला.

प्रकरण काय?

वर्ष 2006 मध्ये ओशिवरा पोलीस ठाण्यात राखी सावंतने हा गुन्हा दाखल केला होता. राखीने मिका विरोधात हा गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार रद्द करण्यासाठी गायक मिका सिंगने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मिकाने बळजबरीने किस केल्याचा आरोप राखीने केला होता. याबाबत मिकाच्या वकिलाचे म्हणणे आहे की, गायकाने आणि राखीने हे प्रकरण सामंजस्याने मिटवले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोर्टातून रद्द करण्यात आलं आहे.

मिका सिंगने 2006 साली राखी सावंतला वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या संमतीशिवाय सर्वांसमोर किस केले होते. न्यायमूर्ती एएस गडकरी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी 10 एप्रिल रोजी मिका सिंगचे वकील सुनावणीसाठी आले. राखी सावंतचे वकील आयुष पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले की, राखी तिच्या कामात व्यग्र आहे, मात्र दोघांनी वाद मिटवला आहे. त्यामुळे तिने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास हरकत नाही. यानंतर आज हा गुन्हा रद्द करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.