नवरदेवाची वरात, वधूच्या दारात, घराला कुलूप लावून वधू पळाली जोरात

नवरदेवाची वरात, वधूच्या दारात, घराला कुलूप लावून वधू पळाली जोरात
प्रतिकात्मक फोटो

नवरदेव वरात घेऊन वधूच्या घरी पोहोचला, तेव्हा तिच्या घराला भलंमोठं कुलूप लटकलं होतं. त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फोन स्वीच ऑफ येत होता. (Bride missing wedding groom )

अनिश बेंद्रे

|

Jan 26, 2021 | 12:40 PM

चंदिगढ : घोड्यावर बसून वाजत-गाजत नववधूच्या घरी वरात घेऊन आलेल्या नवरदेवाची अत्यंत दयनीय अवस्था पाहायला मिळाली. कारण वरपक्ष लग्नासाठी दारात उभं असताना वधूच्या घराला लावलेलं भलंमोठं कुलूप त्यांचं स्वागत करत होतं. पंजाबमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नवरदेवाची स्थिती हसू की रडू अशी झाली आहे. या प्रकरणी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Bride Goes missing on the day of wedding groom reaches home)

महिनाभर सुखी संसाराची स्वप्नं

हरजिंदर सिंह यांचं लग्न महिन्याभरापूर्वी मोगा जिल्ह्यात रेडवा गावात राहणाऱ्या तरुणीसोबत ठरलं होतं. हरजिंदरही अत्यंत आनंदात होता. होणाऱ्या बायकोसोबत संसाराची सुखी स्वप्नं त्याने रंगवायला सुरुवात केली. जेमतेम महिन्याचा वेळ मिळाला असूनही दोघांच्या भेटीगाठी झाल्या होत्या.

लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीकडून वरपक्षाला शगुनही पाठवण्यात आला होता. त्यामुळे वरपक्षात आनंदाचं वातावरण होतं. लग्नाच्या दिवशी सगळे जण उत्साहात वरात घेऊन निघाले. वधूच्या दारात वरात पोहोचली आणि सगळ्यांना धक्काच बसला.

वधूचं आधीच लग्न

वधूचं आधीच कोर्ट मॅरेज झालं आहे, अशी बातमी ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नवरदेव तर हादरलाच, मात्र त्याच्या कुटुंबातही चिंतेचं वातावरण पसरलं. इतकंच नाही, तरुणी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या पहिल्या नवऱ्याला शिक्षाही झाली होती, अशी माहितीही त्यांना मिळाली.

वधूपक्षाऐवजी कुलूप स्वागताला

आम्ही वधूच्या घरी पोहोचलो, तेव्हा तिच्या घराला भलंमोठं कुलूप लटकलं होतं. आम्ही त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फोन स्वीच ऑफ येत होता. त्यामुळे आम्ही वधूच्या कुटुंबाविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं नवरदेवाच्या नातेवाईकांनी सांगितलं. (Bride Goes missing on the day of wedding groom reaches home)

लग्नाच्या नको, पोलिसांच्या बेड्या ठोका

आता वरात घेऊन नववधूच्या दारात पोहोचलेल्या तरुणाने लग्नाच्या बेड्यांऐवजी पोलिसांच्या बेड्या नववधूच्या हातात टाकण्याची मागणी केली आहे. वधूच्या कुटुंबीयांची वरात आता तुरुंगात जाईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

दहा लग्न करणाऱ्या कोट्यधीशाची संपत्तीच्या वादातून हत्या

ऐकावं ते नवलच! लग्नाच्या पत्रिकेत चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड

(Bride Goes missing on the day of wedding groom reaches home)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें