ऐकावं ते नवलच! लग्नाच्या पत्रिकेत चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड

ऐकावं ते नवलच! लग्नाच्या पत्रिकेत चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड

आता नवविवाहित जोडे लग्नसोहळ्यात पाहुण्यांकडून भेटवस्तू घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत.

Nupur Chilkulwar

|

Jan 21, 2021 | 12:31 PM

चेन्नई : कोरोनामुळे लोकांचं जीवन जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे (Madurai Family Print QR Code On Wedding Invitation). या महामारीमुळे लग्न सोहळ्यातही मोठे बदल झाले आहेत. आता नवविवाहित जोडे लग्नसोहळ्यात पाहुण्यांकडून भेटवस्तू घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी आणि भेटवस्तू घेण्यासाठी आता ऑनलाईन मनी ट्रान्सफरचा आधार घेत आहेत. असाच एक अनोखा मार्ग तामिळनाडुच्या मदुरईमधील कुटुंबाने काढला आहे (Madurai Family Print QR Code On Wedding Invitation).

“तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कृपया लग्नाला येताना कपड्यांचे किंवा भांड्यांचे अहेर आणू नका”, असा मजकूर लग्नपत्रिकेच्या खालच्या बाजूला लिहिलेला दिसतो. मात्र, कोरोनामुळे लग्नाला येऊ न शकलेले नातेवाईकांना देखील वधू-वराला अहेर पाठवता यावेत यासाठी लग्नपत्रिकेवर चक्क गुगल पे आणि फोन पेचं क्यूआर कोड छापण्यात आला.

शिवशंकरी आणि सरवनन यांचा लग्नसोहळा रविवारी 17 जानेवारीला पार पडला. त्यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या या अनोख्या लग्नपत्रिकेमुळे. ही लग्नपत्रिका सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाली आहे (Madurai Family Print QR Code On Wedding Invitation).

वधूची आई टी. जेय जयंती यांचं मदुरईमध्ये ब्युटी पार्लर चालवतात. त्यांनी मुलीच्या लग्नात ही आगळीवेगळी परंपरा सुरु केली. त्यांची ही पद्धत सोशम मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल झाली, याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. इतकंच नाही तर त्यांची ही पद्धत कामातही आली. अनेक पाहुण्यांनी-नातेवाईकांनी याचा वापरही केला.

टी. जे. जयंती म्हणाल्या, लग्नपत्रिका व्हायरल झाल्यापासून आम्हाला खूप नातेवाईकांचे, मित्र-मैत्रीणींचे फोन आणि मॅसेजेस येत आहेत. लग्नाला येऊ न शकलेल्या तब्बल 30 हून अधिक नातेवाईकांनी क्यूआरकोडचा पर्याय निवडत वधू-वराला अहेर पाठवले आहेत. अनेकांनी या आयडियाचे कौतुक केले आहे.

Madurai Family Print QR Code On Wedding Invitation

संबंधित बातम्या :

“बरं झालं गेल्या वर्षी रोमँटिक सेलिब्रेशनपेक्षा…” पतीच्या आठवणींना मयुरी देशमुखकडून उजाळा

लग्न बाधलं, 100 जणांना जेवणातून विषबाधा; शिर्डीतील धक्कादायक घटना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें