“बरं झालं गेल्या वर्षी रोमँटिक सेलिब्रेशनपेक्षा…” पतीच्या आठवणींना मयुरी देशमुखकडून उजाळा

बरं झालं गेल्या वर्षी रोमँटिक सेलिब्रेशनपेक्षा... पतीच्या आठवणींना मयुरी देशमुखकडून उजाळा

लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री मयुरी देशमुखने इन्स्टाग्रामवरुन भावनांना वाट मोकळी करुन दिली. (Mayuri Deshmukh Ashutosh Bhakre anniversary)

अनिश बेंद्रे

|

Jan 20, 2021 | 4:31 PM

मुंबई : ‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena) मालिकेतून मराठीचा छोटा पडदा गाजवलेली अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) इन्स्टाग्रामवरुन दिवंगत पती-अभिनेता आशुतोष भाकरेच्या (Ashutosh Bhakre) आठवणी जागवल्या आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मयुरीने भावनांना वाट मोकळी करुन दिली. गेल्या वर्षी याच दिवशी केलेल्या अँडव्हेंचर स्पोर्ट्सचा फोटो शेअर करत मयुरीने स्मरणरंजन केलं. (Actress Mayuri Deshmukh shares memories of late husband Ashutosh Bhakre on anniversary)

मयुरी देशमुखची इन्स्टाग्राम पोस्ट काय?

“गेल्या वर्षी… याच दिवशी… आपली अॅनिव्हर्सरी… नेहमीच्या रोमँटिक सेलिब्रेशनपेक्षा आपण अँडव्हेंचरस गोष्टी केल्याचा मला जास्त आनंद आहे, त्यामुळे आपण जास्त खळखळून हसलो. त्यामुळे आपण हसतानाच्या जास्त आठवणी माझ्यासोबत आहेत” अशी इन्स्टाग्राम पोस्ट मयुरीने केली आहे. सोबत तिने रॉक क्लाईंबिंग करतानाचे दोन फोटोही शेअर केले आहेत.

दुःख सावरत मयुरीचे पुरागमन

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने जवळपास पाच महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये आत्महत्या केली होती. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. नैराश्यामुळे आशुतोषने आत्महत्या केली, असे म्हटले गेले होते. या घटनेने मयुरी देशमुखसह तिच्याच्या चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला होता. त्यानंतर, आता पतीच्या मृत्यूचे दुःख सावरत मयुरी पुन्हा एकदा नव्याने सज्ज झाल्याने, तिच्या चाहत्यांनीही तिचे कौतुक केले आहे.

कुटुंबीय घरात असतानाच गळफास

नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

संबंधित बातम्या :

Mayuri Deshmukh | “आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस…” मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी

मयुरी देशमुखचं पुनरागमन, गश्मीर महाजनीसोबत नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज

(Actress Mayuri Deshmukh shares memories of late husband Ashutosh Bhakre on anniversary)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें