AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांदीचे कडे निघत नसल्याने महिलेचे पाय तोडून नेले; दरोडेखोरांचा क्रूरपणा पाहून पोलिसही हादरले

दरोडेखोरांनी या महिलेच्या पायातून चांदीचे काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण कडे काही निघाले नाहीत. अखेरीस दरोडेखोरांनी महिलेचे पाय धारधार शस्त्रांनी तोडले आणि आपल्या सोबत नेले. काही अंतरावर गेल्यावर दरोडेखोरांनी कडे काढून घेतले आणि महिलेचे पाय फेकून दिले.

चांदीचे कडे निघत नसल्याने महिलेचे पाय तोडून नेले; दरोडेखोरांचा क्रूरपणा पाहून पोलिसही हादरले
उत्तर प्रदेशात पतीकडून पत्नीची हत्या
vanita kamble
vanita kamble | Updated on: Sep 03, 2022 | 12:11 AM
Share

बूंदी : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी एका वृद्ध महिलेचे पाय तोडल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये(Rajasthan) घडली आहे. चांदीचे कडे चोरण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांनी या महिलेचे पाय तोडले आहेत. दरोडेखोरांचा क्रूरपणा पाहून पोलिसही हादरले आहेत. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या पायातील चांदीचे कडे काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडे पायातून निघत नसल्याने दरोडेखोरांनी या पहिलेचे पाय कापून नेले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राजस्थान बुंदीच्या नैनवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावात हा प्रकार घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 80 वर्षीय वृद्ध महिला घरात एकटीच राहत होती. काही दरोडेखोर चोरीच्या उद्देशाने या महिलेच्या घरात घुसले. त्यांनी घरात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, चोरी करणाऱ्यासारख काहीच त्यांना मिळाले नाही. अखेरीस त्यांची नजर महिलेच्या पायातील चांदीच्या कड्यांवर गेली.

दरोडेखोरांनी या महिलेच्या पायातून चांदीचे काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण कडे काही निघाले नाहीत. अखेरीस दरोडेखोरांनी महिलेचे पाय धारधार शस्त्रांनी तोडले आणि आपल्या सोबत नेले. काही अंतरावर गेल्यावर दरोडेखोरांनी कडे काढून घेतले आणि महिलेचे पाय फेकून दिले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरुन पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना झाली आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे.  श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा माग काढला जात आहे. लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश