AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझे वडील फोन उचलत नाहीत, त्यांना सांग… पोलिसाच्या जाचाला कंटाळून बिल्डरचं टोकाचं पाऊल; नालासोपारा हादरलं

नालासोपारा येथील बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांनी पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पोलिस शिपाई श्याम शिंदे याने चौहान यांच्याकडून पैसे घेतले होते, पण तरीही पैशाची मागणी करत त्रास देत होता. चौहान यांनी सुसाईड नोटमध्ये याची नोंद केली आहे. त्यांच्या मुलीने तक्रार दाखल केली असून शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

तुझे वडील फोन उचलत नाहीत, त्यांना सांग... पोलिसाच्या जाचाला कंटाळून बिल्डरचं टोकाचं पाऊल; नालासोपारा हादरलं
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 02, 2025 | 1:30 PM
Share

पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाने टोकाचं पाऊल उचलंत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपारा येथे घडला असून त्यामुळे अख्खं शहरचं हादरलं आहे. जयप्रकाश चौहान असं मृत इसमाचं नाव असून आयुष्य संपवण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आपण पोलिसांच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं होतं. याप्रकरणामुळे शहरात खळबळ माजली असून दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी चौहान यांची मुलगी आणि त्यांचा मित्र परिवार करत आहे. चौकशी नंतर जे आरोपी असतील त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असं आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार यांनी म्हटलंय..

नेमकं काय आहे प्रकरण, का केली आत्महत्या ?

नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे मयत जयप्रकाश चौहान यांनी ओम श्री दर्शन ही इमारत री-डेव्हलपमेंटसाठी अर्थात पुनर्विकासासाठी घेतली होती. तर पोलीस शिपाई श्याम शिंदे यांनी त्यांच्या नातलगामार्फत त्या बांधकामास फायनान्स केलं होतं. एका वर्षात दुप्पटच्या आश्वासनावर शिंदे यांनी 50 लाख रुपयेदे ऊन फायनान्स केले होते. तसेच जामीन म्हणून शिंदे यांनी चौहान यांच्याकडून चार फ्लॅटचा ताबा ही लिहून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे.

पैशांसाठी सतत लावला तगादा

मात्र इमारत बांधकामास एक वर्षाच्यावर कालावधी झाल्याने पोलीस शिपाई श्याम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच यांचा मध्यस्थ लाला लजपत यांनी मयत जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैशाची मागणीचा तगादा लावला. सतत ते पैशांची मागणी करत होते. जयप्रकाश यांनी 22 लाख रुपेय ॲानलाईन आणि 10 लाख रुपये रोख रक्कम असे मिळून 32 लाखांची रक्कम ही श्याम शिंदेला दिली, असं नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलं आहे. मात्र एवढे पैसे देऊनही श्याम शिंदे आणि त्यांचे सहकारी हे पैशांसाठी जयप्रकाश यांना त्रास देत होते. एवढंच नव्हे तर तुला खोट्या गुन्ह्यांत अडकवेन अशी धमकीही देत होते.

अखेर या सर्व त्रासाला कंटाळलेल्या, हताश झालेल्या जयप्रकाश यांनी आपल्या मुलाच्या घरी पंख्याचा लटकून आत्महत्या केली. आपण पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं, त्यांनी आत्महत्यपूर्वी एका चिठ्ठीत लिहून ठेवलं

तुझे वडील फोन उचलत नाहीत, त्यांना…

वडील गेल्यानंतर तरी त्यांना न्याय मिळावा यासाठी लढा देण्याचे ठरवले. बिल्डर जयप्रकाश चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी मयाताच्या मुलीने तक्रार दाखल केली,त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिला शाम शिंदे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता, तो म्हणाला कि, तुझे वडील फोन उचलत नाहीत, त्यांना सांग माझे पैसे द्यायला सांग, नाहीतर जेलमध्ये टाकेन ” असे तो म्हणाल्याचे मुलीने सांगितले. चौहान यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबीय आणि मित्रांतर्फे करण्यात येत आहे.

दोन पोलिस व एका दलालविरोधत गुन्हा दाखल

दरम्यान बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्या प्रकरणात दोन पोलिस आणि एका दलाला वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्याम शिंदे, राजेश महाजन असे पोलिसांचे नाव आहे तर लाजपत लाला असे दलालाचे नाव आहे. चौहान यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहीली होती, त्यात या पोलिसांची नावं होती. आर्थिक व्यवहारातून दलाला मार्फत शिंदे आणि महाजन या पोलिसांनी मानसिक छळ केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात कलम 108, 351 (2), 352 आणि 3 (5) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.