प्रेम विवाह झालेल्या दाम्पत्यात टोकाचे वाद, उशीने तोंड दाबून पत्नीची हत्या

पती शिवाजी आढाव महिलेला मारहाण करत असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. (Buldana Husband kills wife)

प्रेम विवाह झालेल्या दाम्पत्यात टोकाचे वाद, उशीने तोंड दाबून पत्नीची हत्या
बुलडाण्यात पतीकडून पत्नीची हत्या

बुलडाणा : बुलडाण्यात वडिलांनी मुलाची हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच खुनाची आणखी एक घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पतीने आपल्या पत्नीची उशीने तोंड दाबून ठार मारले. हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कुरबुरींनंतर पतीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Buldana Crime Husband kills wife)

चार वर्षांपूर्वी प्रेम विवाह

शिवाजी कैलास आढाव (रा. काकनवाडा, तालुका संग्रामपूर) असे आरोपी पतीचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यातील कावसा येथील संजीवनी आढाव हिच्यासोबत शिवाजीचा प्रेम विवाह झालेला होता. मात्र प्रेमाचा रंग फार दिवस टिकून राहिला नाही. काही दिवसातच दोघांमध्ये भांडण-तंटे व्हायला सुरुवात झाली. हे प्रकरण अगदी पोलिसांपर्यंतही पोहोचलं होतं. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांमध्ये आपसात समेट घडवून आणला.

पत्नीला मारहाण करत असल्याचा आरोप

पती-पत्नी त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात भाड्याने राहायला आले. मात्र संजीवनी आढाव हिला पतीसह सासरकडील मंडळीही खूप त्रास देत होते. पती शिवाजी आढाव तिला मारहाण करत असल्याचा आरोप संजीवनीच्या नातेवाईकांनी केला आहे.

वादावादीनंतर पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या

दरम्यान, बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादावादीतून पतीने उशीच्या सहाय्याने तोंड दाबून पत्नीला जीवे मारलं. यानंतर शिवाजी आढाव हा शेगाव शहर पोलिसात गेला. आपणच आपल्या पत्नीला ठार केल्याचे सांगत त्याने आत्मसमर्पण केलं. या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात आठवड्याभरात लागोपाठ दोन खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आठवड्याभरापूर्वी सख्ख्या बापाने आपल्या मुलाचा गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रेयसीसोबत पळून जाताना रंगेहाथ पकडलं, गावकऱ्यांची प्रियकराला अघोरी शिक्षा

आईला मारहाण झाल्याचा राग अनावर, जन्मदात्या पित्यावर मुलाने गोळ्या झाडल्या!

(Buldana Crime Husband kills wife)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI