बुलडाण्यात बाईकचोरांचा सुळसुळाट, नऊ बाईक्स ताब्यात, तीन चोरट्यांना बेड्या

| Updated on: Jul 22, 2021 | 1:00 PM

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातून मागील काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीच्या घटना घडत होत्या. या प्रकरणात तक्रारी वाढल्याने पोलिसांनी चोऱ्यांचे तपास केला

बुलडाण्यात बाईकचोरांचा सुळसुळाट, नऊ बाईक्स ताब्यात, तीन चोरट्यांना बेड्या
बुलडाण्यात बाईक चोरांना अटक
Follow us on

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून बाईक चोरणाऱ्या चोरट्यांचा तपास लावून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील एकूण नऊ मोटारसायकल जप्त करण्यास मलकापूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आली असून आणखी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातून मागील काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीच्या घटना घडत होत्या. या प्रकरणात तक्रारी वाढल्याने पोलिसांनी चोऱ्यांचे तपास करत बाळु उर्फ कडुबा अंबादास सांगळे (रा. खंडाळा मकरध्वज) आणि बिस्मिल्ला खा इनायत खा (रा. मलकापुर) या दोघांना ताब्यात घेतले होते.

नेमकं काय घडलं?

दोघांकडे कसून चौकशी केली असता मलकापुर शहरातील तसेच बुलडाणा जिल्ह्यातील इतर ठिकाणांवरुन चोरुन लपवून ठेवलेल्या आणि चोरुन विक्री केलेल्या सात मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. तर यावेळी कुणाल राजेंद्र झनके, मलकापुर याला सुद्धा ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात यश आले आहे. असे आरोपींकडून एकूण नऊ मोटार सायकल, अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगलीत बाईक चोराला बेड्या

दुसरीकडे, घरफोडी, दुचाकी चोरी प्रकरणातील सराईत चोरट्याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नुकतेच जेरबंद केले आहे. आकाश सतिश कवठेकर (वय 24) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, लॅपटॉप असा 2 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुपवाड परिसरातील तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

भंगारात सापडलेल्या स्कॉचच्या बाटल्यांतून बनावट मद्याची विक्री, मुंबईच्या दोघांना पुण्यात अटक

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून दागिने-पैशांची चोरी, मिरा रोडमधून मायलेकाला अटक

पार्किंगमधून बाईक चोरी, सोन्याचे दागिनेही पळवले, 24 वर्षीय तरुणाला अटक

(Buldana Three Bike theft arrested with nine two wheelers)