AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांची भीती संपली? महाराष्ट्रात आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने जबर मारहाण

crime news: सरपंच निलेश देशमुख आणि त्यांचे मित्र हे बारमध्ये जेवायला बसलेले होते तर आरोपी सुद्धा बाजूच्या केबिबमध्ये जेवायला बसलेले होते. दोन्ही गटात यावेळी थुंकण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले.

पोलिसांची भीती संपली? महाराष्ट्रात आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने जबर मारहाण
crime news
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 06, 2025 | 2:07 PM
Share

Crime news: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरुन राज्यात संतप्त प्रतिक्रिया अजूनही सुरु आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आक्रोश व्यक्त होत आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आंदोलने होत आहे. त्याचवेळी पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुटाळा ग्रामपंचायतच्या सरपंचावर लोखंडी रॉडने हल्ला जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहे. किरकोळ कारणावरुन हा हल्ला झाल्यामुळे राज्यात गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

काय घडला प्रकार

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आला आहे.

का झाला हल्ला?

हॉटेलमध्ये थुंकण्यावरून हा वाद झाला आहे. सरपंच निलेश देशमुख आणि त्यांचे मित्र हे बारमध्ये जेवायला बसलेले होते तर आरोपी सुद्धा बाजूच्या केबिबमध्ये जेवायला बसलेले होते. दोन्ही गटात यावेळी थुंकण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. या शुल्लक कारणामुळे सरपंच निलेश देशमुख यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर हा जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे.

याप्रकरणी दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच देशमुख यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुद्धा आपणास सरपंचसह तिघांनी मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राज्यात गुन्हेगारांकडून हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?