तुरुंग ते कॅनाडापर्यंत गुन्हेगारी साम्राज्य,अतिरेकी संघटनेचे लेबल लागल्याने लॉरेन्स गँगचे आता काय होणार ?
लॉरेन्स बिश्नोई याचे गुन्हेगारी साम्राज्य भारतीय तुरुंगांमधून चालवले जाते आणि ते कॅनडासह अनेक देशात पसरलेले आहे. त्याच्याकडे 700 हत्यारधारी युवक कामाला असल्याने कॅनडा सरकारने जरी या टोळीला अतिरेकी गट ठरवले असले तरी त्याच्यावर खरोखरच अंकुश लागणार आहे का हा प्रश्न आहे.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि बॉलीवूड स्टार सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आली होती. आता लॉरेन्स बिश्नोई याला कॅनडा सरकारने अतिरेकी घोषीत केले आहे आणि त्याच्या गँगलाही अतिरेकी संघटनेच्या यादीत टाकल्याने तुरुंगातून असून आपली आंतरराष्ट्रीय गँग चालवणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई आता काय होणार असा सवाल केला जात आहे. कॅनडा सरकारने लाँरेन्स बिश्नोई याला आणि त्याच्या गँगला अतिरेकी घोषीत केले आहे. आता कॅनडात बिश्नोई गँगची संपत्ती जप्त केली जाऊ शकते. त्याच्या गँगला पैसा देणारे आणि अन्य मदत करणारेही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात. त्यामुले कॅनडातील बिश्नोई गँगच्या साम्राज्याला मोठा...
