Video : विनाड्रायव्हरची गाडी पुणे-नाशिक महामार्गावर, गाडीचा हँडब्रेक लावायला विसरल्यास काय होतं? पाहाच

| Updated on: Mar 26, 2022 | 12:16 AM

उताराला असलेली गाडी मागे सरकार हायवेवर आली. या गाडीला विनाड्रायव्हरचे मागे (Without driver tempo) येताना पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

Video : विनाड्रायव्हरची गाडी पुणे-नाशिक महामार्गावर, गाडीचा हँडब्रेक लावायला विसरल्यास काय होतं? पाहाच
पुण्यातला थरारक व्हिडिओ
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : तुम्हीही गाडीचा हँडब्रेक (Hand break) लावायला विसरत असाल तर ही बातमी पूर्ण वाचा आणि त्याचा व्हिडिओ (Cctv Video) सुद्धा पहा. त्याचं झालं असं की एका बहाद्दराने गाडी लावली आणि हँड ब्रेक लावायला विसरला. मात्र उताराला असलेली गाडी मागे सरकार हायवेवर आली. या गाडीला विनाड्रायव्हरचे मागे (Without driver tempo) येताना पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेकांना वाटलं ही गाडी आता मागे मेन रोडवरील कोणालतरी धडक देणार. मात्र महामार्गावर गाड्या चालवणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगत या गाडीकडे नीट लक्ष ठेवले. आणि ही गाडी जवळ येताच आपल्या गाड्या जैसे थे मागेच थांबवल्या व ही गाडी रस्ता क्रॉस होऊ द्याची वाट पाहिली. त्यातल्या कित्येकांच्या तर हेही लक्षात आलं नाही, की ही गाडी आपोआप मागे येतेय.

पुण्यातल्या मंचरमधील धक्कादाय प्रकार

पुणे जिल्ह्यातील मंचर येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती समोर माल वाहतूक करणाऱ्या गाडीसोबत घडलेला हा सर्व प्रकार आहे. हॅन्डब्रेक न लावल्यामुळे गाडी थेट उताराणे रिव्हर्स पुणे-नाशिक महामार्गावर आली. हा सर्व प्रकार cctv मध्ये कैद झाला आहे. दैव बलबत्तर म्हणून मोठा अपघात होता होता वाचला,या घटनेमध्ये कोणतीच जिवीत हानी झाली नही. मात्र हा संपूर्ण घटनाक्रम तुमच्यााही अंगावर काटा उभा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र नक्की. ही गाडी विनाड्रायव्हरची मागे येतेय आणि पुन्हा उतारने रसत्यावर जातेय हे लोकांच्या लक्षात आल्यावर धावत गाडीत जाऊन एकाने गाडी थाबवली.

व्हिडिओ पाहान अंगावर काटा

या गाडीला मागे येताना नीट पाहिलं तर रस्त्यावरची लोक आरोमात त्यांच्याच गुगीत चालत आहेत. त्यांना या गाडीत कोण नाही याची जराही खबर नाही. या व्हिडिओत पाहू शकता. ही गाडी मागे येताना एक महिला अगदी थोड्या अंतरावरून सहज आरामात तिच्या स्पीडने चालत जात आहे. ही गाडी अगदी तिच्या जवळून घासून जातेय. मात्र गाडीत कोणीच नाही हे महिलेला अजूनही कळालेलं नाही. त्यामुळे ज्यावेळी लोकांच्या लक्षात हा प्रकार आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यात कुणालाच हानी पोहचली नसल्याने थडो दिलासा मिळाला मात्र नेहमीच असे घडले असे नाही, त्यामुळे चालकांनी आपली वाहने पार्क करतानी व्यवस्थित पार्क करावी,जेने करून अशा घटना घडणार नाही.

Wardha Crime : पैशासाठी महिलेची हत्या करणाऱ्या बापलेकास सश्रम कारावासाची शिक्षा

Belgaum Murder : बेळगावमध्ये भररस्त्यात पतीकडून पत्नीची धारदार शस्त्राने वार करत हत्या

Satara Crime : साताऱ्यात 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम अखेर जेरबंद