बिल्डरला ‘ती’ एक चुक नडली, पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा, बांधकाम क्षेत्रात उडाली खळबळ

बांधकामाच्या ठिकाणी खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. बिल्डरने बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे पालन न केल्याचेही उघड झाले आहे.

बिल्डरला 'ती' एक चुक नडली, पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा, बांधकाम क्षेत्रात उडाली खळबळ
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 7:38 AM

नाशिक : बांधकाम सुरू असतांना अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही. विशेष म्हणजे त्याकडे स्थानिक प्रशासनही दुर्लक्ष करत असते. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. बिल्डरच्या चुकांमुळे अनेकांचा नाहक बळी गेला आहे. अशीच घटना गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी एका दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपूर्व बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचे अपूर्व राजेंद्र तोंडूलकर याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अपूर्व बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स ज्या ठिकाणी काम सुरू आहे तिथे नियमांचे पालन केले नसल्याची बाबही समोर आल्याने नाशिकमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहे.

अशी घडली घटना अपूर्व बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी लिफ्टसाठी खड्डा खोदण्यात आले आहे. तो पूर्ण पाण्याने भरलेला स्थितीत होता. सुभाष भागवत यांचा मुलगा यश भागवत खेळत होता. खेळता खेळता तो पाण्यात पडला त्यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामध्ये यशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन यश भागवतच्या मृत्यूनंतर बिल्डरने बांधकामाच्या वेळी अनेक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. बांधकाम करतांना संशयित बिल्डर राजेंद्र तोंडूलकर यांनी चहू बाजूने शेड केलेले नाहीत. सुरक्षा रक्षकही नेमलेला नाही. लिफ्टसाठी केलेल्या खड्ड्याभोवती सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

हे सुद्धा वाचा

या कारणामुळे बिल्डरवर गुन्हा बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. आणि हीच बाब बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे गंगापूर पोलीस ठाण्यात बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याने शहरातील बिल्डर क्षेत्रात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.