AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने तिघा रेल्वे अधिकाऱ्याने केली अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ओदिशा रेल्वे अपघाताप्रकरणात सीबीआयने अखेर शुक्रवारी तिघा रेल्वे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1100 प्रवासी जखमी झाले होते.

बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने तिघा रेल्वे अधिकाऱ्याने केली अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
railway accident odisha balasore
| Updated on: Jul 08, 2023 | 12:38 PM
Share

नवी दिल्ली : दोन दशकातील सर्वात मोठा रेल्वे अपघात म्हणून ओळखला जाणाऱ्या ओदिशा रेल्वे  ( Balasore Train Accident ) अपघात प्रकरणात सीबीआयने ( CBI ) अखेर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तिघा रेल्वे अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या रेल्वे अपघातात 292 जणांचा मृत्यू तर 1100 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात काही हेतुपुरस्सरपणे सिग्नलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगमध्ये छेडछाड केल्याचा संशय होता. त्यानंतर रेल्वे बोर्डाच्या शिफारसीवरुन हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ओदिशा रेल्वे अपघाताप्रकरणात सीबीआयने शुक्रवारी तिघा रेल्वे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या वरिष्ठ इंजिनिअर अरुण कुमार महंत, सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार या तिघांना अटक करण्यात आली आहे. ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यात बहनगा रेल्वे स्थानकाजवळ 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात कोरोमंडळ एक्सप्रेसची लूप लाईनवर उभ्या असलेल्या एका मालगाडीला धडक दिली होती. त्यानंतर या कोरोमंडळ एक्सप्रेसच्या डब्यांना धडकून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या यशवंतपूर एक्सप्रेसचेही डबे रुळांवरुन घसरले होते. यात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1100 प्रवासी जखमी झाले होते.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

या तिघा अधिकाऱ्यांना आयपीसी कलम 304 ( सदोष मनुष्यवध ) आणि 201 (गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. अटक केलेल्या आरोपीची सीबीआय चौकशी करणार आहे. सिग्नलिंग मेंटनरने एक रीकनेक्शन मेमो जारी केला होता. याचा अर्थ देखभालीचे काम पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सिग्नलिंग सिस्टम लाईव्ह होता. ट्रेनला जाण्याची परवानगी देण्यापूर्वी सिग्नलिंग प्रणालीचे परीक्षण करण्याच्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले गेले नव्हते असे रेल्वे बोर्डाच्या सूत्रांनी इंडीयन एक्सप्रेसला सांगितले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.