Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या हत्येची शक्यता नाकारता येत नाही; सीबीआयचं सुब्रमण्यम स्वामींना दोन पानी पत्रं

अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? याबाबतची कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. (cbi submits its reply to subramanian swamy )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:51 PM, 30 Dec 2020
Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या हत्येची शक्यता नाकारता येत नाही; सीबीआयचं सुब्रमण्यम स्वामींना दोन पानी पत्रं

नवी दिल्ली: अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? याबाबतची कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुशांतच्या मृत्युबाबतचे वेगवेगळे कयास वर्तवले जात असतानाच सीबीआयने एक मोठी शक्यता वर्तवली आहे. सुशांतची हत्या झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सीबीआयने म्हटलं आहे. सीबीआयने भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना दोन पानी पत्र लिहून ही शक्यता वर्तवली आहे. (cbi submits its reply to subramanian swamy )

सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे? असा सवाल करत सुब्रमण्यम स्वामी यांनी सीबीआयला एक पत्र लिहिलं होतं. त्यामुळे सीबीआयने स्वामींना एक सुशांत मृत्युप्रकरणाचा एक रिपोर्ट पाठवला आहे. हा दोन पानी रिपोर्ट स्वामी यांनी ट्विट केला असून त्यातून ही माहिती पुढे आली आहे. याप्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. मात्र, कोणत्याही निष्कर्षाप्रत लगेच पोहोचता येणार नसल्याचं सीबीआयने म्हटलं आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यात वैज्ञानिक आणि तांत्रिक बाबींचाही आधार घेण्यात आला आहे. ही केस आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तिचा प्रत्येक अँगलने तपास केला. केवळ मुंबईतच नव्हे तर दिल्ली, अलीगड, फरिदाबाद आणि हैदराबादपर्यंत जाऊन आम्ही या प्रकरणाचा तपास केला आहे, असं सीबीआयने या पत्रात नमूद केलं आहे. सुशांतचा मृत्यु कसा झाला? हे शोधण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टींचा अभ्यास केला. त्याचे फोन आणि लॅपटॉपही आम्ही तपासले आहेत. प्रत्येक संशयितांची कसून चौकशी केली आहे. त्याच्या मित्रांसहीत कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर फॉरेन्सिक लॅबचीही मदत घेण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलं आहे.

ही आत्महत्याच आहे, असं सीबीआयने म्हटलेलं नाही किंवा सुशांतची हत्या करण्यात आल्याच्या त्याच्या फॅन्सच्या शंकांनाही नाकारलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात याप्रकरणी मोठा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. (cbi submits its reply to subramanian swamy )

 

संबंधित बातम्या:

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

शेवटच्या सिनेमात आत्महत्या न करण्याचा मंत्र, आठ महिन्यांनी स्वत:चं जीवन संपवलं

(cbi submits its reply to subramanian swamy )