AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Accident : जीवलग मैत्रिणी परीक्षेसाठी एकत्र निघाल्या, वाटेत कारची स्कूटीला धडक! दोघीही जागीच ठार

Chandrapur Accident News : परीक्षेला जात असताना त्यांच्या स्कूटीचा अपघात झाला. एका कारनं त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.

Chandrapur Accident : जीवलग मैत्रिणी परीक्षेसाठी एकत्र निघाल्या, वाटेत कारची स्कूटीला धडक! दोघीही जागीच ठार
भीषण अपघात...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 15, 2022 | 9:17 AM
Share

चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यात शिक्षकाचा बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता अपघाताची आणखी एक भीषण घटना समोर आली आहे. चंद्रपुरात झालेल्या अपघातामध्ये दोघा विद्यार्थीनींचा मृत्यू झालाय. चंद्रपुरात (Chandrapur Accident News) ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. कार आणि दुचाकीच्या (Car Bike Road Accident) अपघातामध्ये दोघा जीवलग मैत्रिणींचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. या दोघीही जणी एकत्र स्कूटीवरुन निघाल्या होत्या. पदवीच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या विद्यार्थ्यीनी परीक्षेसाठी निघाल्या होत्या. परीक्षेला जाताना त्यांच्या स्कूटीला एका भरधाव कारने चिरडलं. या अपघातामध्ये दोघींनाही गंभीर दुखापत होऊन दोघींचाही जागीच जीव गेलाय. डिग्रीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या तरुणींच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. हा अपघात प्रचंड भीषण (Chandrapur News) होता. त्यात या दोघा तरुणींचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झालाय.

जीवलग मैत्रिणींचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-गडचांदूर मार्गावर हा अपघात घडला. गडचांदूर जवळील निंबाळा येथे राहणाऱ्या दोघी जीवलग मैत्रिणी परीक्षेसाठी निघाल्या होत्या. शगुणा झाडे आणि प्रांजली मेश्राम अशी दोघा मैत्रिणींची नावं आहेत. त्या राजुरा येथील महाविद्यालायत शिक होत्या. परीक्षेला जाण्यासाठी त्या एकत्र निघालेल्या.

कारने चिरडलं

परीक्षेला जात असताना त्यांच्या स्कूटीचा अपघात झाला. एका कारनं त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्यात दोघींच्याही डोक्याला जबर मार बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आर्वी खामोना दरम्यान, विरुद्ध दिशेनं येणाऱ्या कारने या दुचाकीला धडक दिली आणि हा अपघात झाला.

पाहा व्हिडीओ : अपघातात शिक्षकाचा मृत्यू

कुटुंबीयांना मोठा धक्का

या अपघातामध्ये एक युवक गंभीर जखमी झालाय. जखमी झालेल्या युवकावर उपचार सुरु आहेत. जखमी युवक राजुरा जवळील चुनाळा येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, दोन्ही जीवलग मैत्रिणीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. पोलिसांकडून या अपघातप्रकरणी सध्या अधिक तपास केला जातोय. तर कुटुंबातील तरुण मुलींचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे झाडे आणि मेश्राम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार