AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‍ॅडल्ट व्हिडीओ… 3 कोटी… सीएने उचललं टोकाचं पाऊल, 3 पानांच्या चिठ्ठीत आणखी काय?

मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या एक प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे याने टोकाचं पाऊल उचललं. अडल्ट व्हिडिओच्या नावाखाली त्याला सतत ब्लॅकमेल केले जात होते, ज्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला आणि त्याच भरात त्याने भयानक पाऊल उचललं, असा आरोप आहे. मात्र विष प्राशन करून आयुष्य संपवण्यापूर्वी राज याने एक तीन पानी सुसाईड नोट लिहीली असून आपल्या मृत्यूसाठी […]

अ‍ॅडल्ट व्हिडीओ... 3 कोटी... सीएने उचललं टोकाचं पाऊल, 3 पानांच्या चिठ्ठीत आणखी काय?
सीएने उचललं टोकाचं पाऊलImage Credit source: social media
| Updated on: Jul 08, 2025 | 1:26 PM
Share

मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या एक प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे याने टोकाचं पाऊल उचललं. अडल्ट व्हिडिओच्या नावाखाली त्याला सतत ब्लॅकमेल केले जात होते, ज्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला आणि त्याच भरात त्याने भयानक पाऊल उचललं, असा आरोप आहे. मात्र विष प्राशन करून आयुष्य संपवण्यापूर्वी राज याने एक तीन पानी सुसाईड नोट लिहीली असून आपल्या मृत्यूसाठी राहुल परवानी आणि सबा कुरेशी हे दोघे जबाबदार आहेत, असा आरोप त्याने नोटमध्ये केला आहे. या आधारावर पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि खंडणी वसूल करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

18 महिन्यांत 3 कोटी उकळले

वाकोला पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत इसम राज मोरे हा एका फर्ममध्ये सीए म्हणून काम करत होता. गेल्या 18 महिन्यांत राज मोरेकडून सुमारे 3कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. राहुल परवानी याने राजचे खाजगी व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केले आणि नंतर सबा कुरेशीसोबत मिळून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले, असा आरोप आहे.

सोशल मीडियाद्वारे झाली ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून राजची सबा कुरेशीशी ओळख झाली. हळूहळू दोघांमधील संभाषण आणि संवाद वाढत गेला. वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचे शारीरिक संबंधा ले. आणि त्याच काळात राहुलने राजचे खासगी व्हिडिओ बनवले आणि नंतर त्याला धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

घरी येऊन मारहाण आणि शिवीगाळ

मात्र हे दोन्ही आरोपी जेव्हाराजच्या वाकोला येथील घरी पोहोचले तेव्हा प्रकरण अधिक गंभीर झाले. त्यांनी राजला त्याच्या आईसमोर मारहाण केली एवढंच नव्हे तर त्याला शिवीगाळही केली. तसेच त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. या घटनेने राज मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाला आणि शनिवारी रात्री त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मात्र त्यापूर्वी त्याने एक नोट लिहून दोघांची नावे उघड करत त्यांच्यामुळेच हे पाऊल उचलत असल्याचा आरोप केला.

राजची सुसाईड नोट आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी सबा कुरेशी आणि राहुल परनवानी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार आहेत आणि पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.