AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वर्षांनी बाळ झालं, बारसं आटोपून निघतानाचा काळाचा घाला ! मद्यधुंद तरूणांच्या कारची धडक, चौघेही…

दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचं बारसं आटोपून निघालेल्या एका कुटुंबाच्या कारला दारू पिऊन ड्रायव्हिंग करणाऱ्या तरूणांच्या कारने जोरदार धडक दिली. त्यामध्ये आई-बाळासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

10 वर्षांनी बाळ झालं, बारसं आटोपून निघतानाचा काळाचा घाला ! मद्यधुंद तरूणांच्या कारची धडक,  चौघेही...
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Sep 14, 2024 | 10:13 AM
Share

आयुष्य हे अतिशय क्षणभंगूर आहे. सध्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक भीषण अपघात घडल्याने शहर हादरलं आहे. तब्बल 10 वर्षानंतर झालेल्या बाळाच बारसं आटोपून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन ड्राईव्ह करणाऱ्या तरूणांच्या कारने जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात हिट अँड रनचा हा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी दोघा तरूणांना अटकही करण्यात आली आहे.

बारसं आटोपून परत निघाले आणि काळाने घातली झडप

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात हिट अँड रनच्या अनेक घटना घडत आहेत. पुण्यातील पोर्श कार अपघात, वरळीत पहाटे महिलेला उडवल्याची घटना किंवा गेल्याच आठवड्यात नागपूरमध्ये झालेला अपघात, एकामागोमाग एक असे अपघात घडतच आहेत. त्याचदरम्यान छ. संभाजीनगरमध्येही ड्रंक अँड ड्राईव्हचा हा थरारक अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त देसरकर कुटुंब हे पुण्याला जात असताना दारू पिऊन स्कॉर्पिओ ड्राईव्ह करणाऱ्या दोन तरूणांनी त्यांच्या कारला धडक दिली . संभाजीनगरपासून जवळच असलेल्या नगर रोडवर हा अपघात घडला. देसरकर कुटुंब हे 10 वर्षानंतर झालेल्या बाळाचं बारसं आटोपून पुण्याच्या दिशेने निघाले होते, तेव्हाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघात चौघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन लहान मुलांचाही मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

धक्कादायक गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना दारू पिऊन गाडी भरधाव चालवत धडक दिल्याने हा अपघात झाला.या अपघातास कारणीभूत ठरलेले विशाल चव्हाण ( वय 22) आणि कृष्णा केरे ( वय 19) या दोन तरूणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना बेड्याही ठोकल्या आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास