AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लक्ष्मीला ठार मारलंय… नवऱ्याने ठेवलं व्हॉट्सअप स्टेट्स, एकाच घरात दोघे… अख्खं गाव हादरलं

छत्तीसगडमधील धमतरी येथे पती-पत्नीच्या हत्या-आत्महत्येने गाव हादरले आहे. पतीने पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. मृत्यूआधी त्याने व्हॉट्सअप स्टेटसवर सासू-सासऱ्यांना जबाबदार धरले होते. कौटुंबिक वाद आणि हुंडाबळीची शक्यता तपासली जात असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे गावात शांतता पसरली आहे.

लक्ष्मीला ठार मारलंय... नवऱ्याने ठेवलं व्हॉट्सअप स्टेट्स, एकाच घरात दोघे... अख्खं गाव हादरलं
नवऱ्याच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे गाव हादरलं
| Updated on: Oct 22, 2025 | 1:00 PM
Share

नवरा बायकोचा झगडा आणि त्यातून पत्नीची हत्या झाल्याचं प्रकरण उघड झालं आहे. छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील बिगडी चौकी येथील हरदी गावात ही भयानक घटना घडली आहे. या घटनेने सर्वच हादरून गेले आहेत. एक वर्षापूर्वीच हिम्मत यादव आणि लक्ष्मी यादवचं लग्न झालं होतं. पण वर्षभरातच हिम्मत आणि लक्ष्मीची डेडबॉडी त्यांच्या घरातच सापडल्याने अख्खं गाव हादरून गेलंय. मृत्यूपूर्वी हिम्मतने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवला होता. त्यात त्याने लक्ष्मीची हत्या केल्याचं आणि स्वत:ही आत्महत्या करत असल्याचं लिहिलं होतं. तसेच दोघांच्याही मृत्यूला त्याने सासू सासऱ्यांना जबाबदार धरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. तर, या घटनेमुळे दोन्ही कुटुंबामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिम्मत (28 वर्ष) आणि लक्ष्मी (25 वर्ष) यांचं लग्न गेल्याच वर्षी अत्यंत धुमधडाक्यात झालं होतं. हिम्मत हा हरदी गावचा रहिवासी असून तो शेतकरी आहे. तर लक्ष्मी ही शेजारच्या भागात राहायची. लग्नानंतर दोघांचंही चांगलं चाललं होतं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने खटके उडत होते. मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांना घरातून घाणेरडा वास येऊ लागल्याने त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा दोघांचेही मृतदेह आढळून आले. लक्ष्मीच्या गळा आणि मानेवर मारल्याच्या खुणा होत्या. यावरून लक्ष्मीची धारदार शस्त्राने हत्या झाल्याचं स्पष्ट होत होतं. तर हिम्मतच्या शरीरावर एकही व्रण नव्हता. पण त्याच्या मोबाईल स्टेट्सने संपूर्ण खूनाचं रहस्यच उघड केलं.

आता मला जगायचं नाहीये…

हिम्मतने ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेट्स अत्यंत धक्कादायक होतं. मी माझी पत्नी लक्ष्मीची हत्या केली आहे. सासूसासऱ्यांमुळेच मला हे करावे लागले. आता मला जगायचं नाहीये, असा स्टेट्स हिम्मतने ठेवला होता. काही तासांपूर्वीच त्याने हा मेसेज ठेवला होता. पोलिसांनी पुरावा म्हणून या स्टेट्सचा स्क्रिनशॉट काढला आहे. हे हत्या आणि आत्महत्येचं प्रकरण असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी हिम्मतच्या सासूसासऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पण दोघांनीही या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाच्या आणखी खोलात जाण्यासाठी पोलीस मोबाईल रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत.

गावात सन्नाटा…

शेजाऱ्यांच्या मते, लग्नानंतर लक्ष्मीला सासरच्यांकडून टोमणे मारले जात होते. तिच्याकडून हुंडा मागितला जात होता. पण हिम्मतने तिला कधीच काही म्हटलं नाही. हिम्मतचा भाऊ रामू यादव याने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या भाऊ खूप त्रस्त होता. काही दिवसांपासून तो शांत राहत होता. घरात काही तरी काळंबेरं आहे, याचा आम्हाला संशय आला होता, असं रामूने सांगितलं. दरम्यान, या घटनेमुळे गावात सन्नाटा पसरलाय. हुंडाबळीचे प्रकार रोखण्यासाठी गावागावात जनजागृती अभियान राबवण्याची मागणी महिलांनी केली आहे.

पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्यूमागचं नेमकं कारण समजणार आहे. दरम्यान, सासू सासऱ्यांच्या विरोधात हत्या आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.