AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याचं परक्या बाईसोबत लफडं, पण कोर्टाने बायकोलाच ठरवलं दोषी; असं काय घडलं?

गुआंग्शीमधील ली नावाच्या महिलेने आपल्या नवऱ्याच्या बेवफाईचा पुरावा मिळवण्यासाठी लपवलेला कॅमेरा बसवला. पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर, तिने हा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल केला. मात्र, कोर्टाने तिच्या कृतीला गैरबैध ठरवले आणि प्रायव्हसीच्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवले.

नवऱ्याचं परक्या बाईसोबत लफडं, पण कोर्टाने बायकोलाच ठरवलं दोषी; असं काय घडलं?
Couple Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 22, 2025 | 7:14 PM
Share

भारत असो पाकिस्तान असो वा चीन, अमेरिका. नवरे इथून तिथून सारखेच. काही सज्जन तर काही लफडेबाज. मग अशा लफडेबाज नवऱ्यांना कसं वठणीवर आणायचं हे जगभरातील महिलांनाही कळतं हो. चीनमध्ये असाच पती, पत्नी आणि वोचा किस्सा घडला. हे प्रकरण ऐकल्यावर सर्वांनाच धक्का बसला. गुआंग्शी येथे राहणाऱ्या ली नावाच्या एका महिलेला तिच्या नवऱ्यावर संशय बळावला. आपला नवरा आपल्या पाठी आपल्याला धोका देतोय, असं तिला वाटलं. त्यामुळे तिने गुपचुपपणे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये हिडन कॅमेरा लावला. धक्कादायक गोष्ट म्हणजे सावज जाळ्यात सापडलं. तिचा नवरा प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडला गेला. त्यानंतर ही बया इथेच थांबली नाही. नवऱ्याच्या अय्याशीचा हा व्हिडीओच तिने ऑनलाइन व्हायरल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने मात्र नवऱ्याचं लफडं असूनही त्याच्या बायकोलाच दोषी धरलं आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, हिडन कॅमेऱ्यात या महिलाचा नवरा आणि घरमालकीन वांग हिचे अनेक खासगी क्षण रेकॉर्ड झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर लीचा पाराच चढला. तिने सर्व व्हिडीओ फुटेज सोशल मीडियावर शेअर करून व्हायरल केले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपल्यावर कुणी तरी देखरेख करतंय हे वांगच्या लक्षात आलं. त्यानंतर आता हे प्रकरण कोर्टात गेलं आहे.

वाचा: सासूशी लग्न करणाऱ्या जावयाला वडिलांनी हकलले घरा बाहेर, पत्नीने लगेच तयार केला दुसरा प्लान

वांगने ठोकला दावा

वांगने या महिलेच्या विरोधात कोर्टात खटला भरला आहे. प्रायव्हसीचं हनन झाल्याचा आणि आपली प्रतिमा मलिन करून भावनात्मकरित्या नुकसान केल्याचा आरोप वांगने याचिकेत केला आहे. तसेच सार्वजनिकरित्या माफी मागण्याची आणि भरपाई देण्याची मागणीही वांगने केली आहे. तर, माझं वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी आणि मुलांच्या भविष्याची चिंता असल्यानेच मी ही कृती केल्याचा दावा ली ने केला आहे.

कोर्टाचे आदेश काय?

कोर्टानेही वांगची बाजू घेतली असून ली ला दोषी ठरवलं आहे. वांगच्या प्रायव्हसीचं उल्लंघन झालं आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. वांग स्वत: अवैध नातेसंबंधात अस्लयाने कोर्टाने सामाजिक आणि नैतिकमूल्ये पाहून ली हिला सोशल मीडियावरून सर्व फुटेज हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सार्वजनिक माफी मागण्याची आणि भरपाई देण्याची मागणी मात्र कोर्टाने फेटाळून लावली आहे.

लीचा हेतू भलेही नवऱ्याची बेवफाई समोर आणण्याचा होता. पण याचा अर्थ कुणाच्याही प्रायव्हसीचं हनन केलं जाऊ शकत नाही. एखाद्याची वैयक्तिक माहिती शेअर करणं बेकायदेशीर आहे. या प्रकरणातून प्रायव्हसी हा एक मौलिक अधिकार आहे. मग ती कोणतीही परिस्थिती असो. कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर वैवाहिक धोका न्याय मिळवण्याचा बहाणा बनू शकत नाही.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.