AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : सफाईचा बहाणा करून घरात शिरला आणि… , अखेर सापडला एअर होस्टेसचा खुनी, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पवईतील एका रहिवासी इमारतीत एअर होस्टेसचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर याप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली असून अवघ्या तासांच्या आतच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

Mumbai Crime : सफाईचा बहाणा करून घरात शिरला आणि... , अखेर सापडला एअर होस्टेसचा खुनी,  पोलिसांनी आवळल्या मुसक्या
| Updated on: Sep 05, 2023 | 10:52 AM
Share

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : मुंबईतील अंधेरी भागातील एका इमारतीत राहणाऱ्या एअर होस्टेसचा (air hostess murder) मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली होती. रुपल ओगरे असे तिचे नाव असून तिचा गळा चिरण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या चोवीस तासांच्या आतच मारेकऱ्याला अटक करण्यात त्यांना यश (man arrested) मिळाले. विक्रम अटवाल (वय 40) असे आरोपीचे नाव असून त्यानेच रुपलचा खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपी विक्रम हा रुपल राहत असलेल्या इमारतीतच काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे. तो मुळचा चांदिवलीतील तुंगा गावचा रहिवासी असून पोलिसांनी अथक प्रयत्नांती त्याला ताब्यात घेत मुसक्या आवळल्या.

सफाईचा बहाणा करून घरात शिरला

रविवारी दुपारी सफाईच्या बहाण्याने आरोपी विक्रम हा रुपलच्या घरात घुसला, असे समजते. मात्र त्याने रुपलचा खून नेमका का केला हे अद्याप समजू शकलेले नाही पोलिसांच्या तपासात लवकरच त्यामागचे कारण स्पष्ट होईल. रुपल हिची धारदार चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

रुपल ओगरे ही मूळची छत्तीसगडच्या, रायपूर येथील रहिवासी होती. मात्र सध्या ती मुंबईतील मरोळ येथील एक इमारतीतील फ्लॅटमध्ये रहात होती. तिच्यासोबत तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्सही होते. तिची गळा चिरून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले. सोमवारी ही घटना उघडकीस आली होती. घटनेच्य दिवशी रूपल घरात एकटीच होती. तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्स हे गावी गेल्याने तिच्यासोबत घरी कोणीच नव्हते. तिचे कुटुंबीय तिला बऱ्याच काळापासून कॉल करत होते, मात्र ती फोन उचलत नव्हती. अखेर त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून ती ठीक आहे ना हे बघण्यास सांगितले. तिची मैत्रीण घरी पोचली असता, बराच वेळ कोणीही दरवाजा उघडला नाही. अखेर डुप्लीकेट चावीच्या मदतीने ती घरात आली असता, तिला रुपल मृतावस्थेत आढळली. गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पवई पोलीस आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर इमारतीतच सफाईचे काम करणाऱ्या विक्रमला हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.