उल्हासनगरात जुगार क्लब चालकाला संपवले, घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी घटनांचे सत्र वाढले आहे. सतत या ना कारणाने हत्यांकांडाच्या घटनाही वाढत आहेत. अशीच एक घटना काल उघडकीस आली आहे.

उल्हासनगरात जुगार क्लब चालकाला संपवले, घटना सीसीटीव्हीत कैद
जुगार क्लब मालकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 3:29 PM

उल्हासनगर : उल्हासनगरात मध्यरात्रीच्या सुमारास खळबळजनक घटना घडली आहे. एका जुगार क्लब चालकाची क्लबमध्ये घुसून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शब्बीर शेख असं मृत क्लब चालकाचं नाव आहे. उल्हासनगर कॅम्प 5 परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 5 ते 6 जणांनी त्याची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र तपासाअंतीच हत्येचे खरे कारण कळेल.

क्लबमध्ये घुसून शेखवर हल्ला

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील जय जनता कॉलनीमध्ये शब्बीर शेख हा जुगाराचा क्लब चालवत होता. शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास 5 ते 6 जण हातात धारदार शस्त्र घेऊन त्याच्या क्लबमध्ये घुसले. आरोपींनी क्लबमध्ये बसलेल्या शब्बीर शेख याच्यावर हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झालेल्या शब्बीर याला आधी उल्हासनगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तेथून त्याला कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला. शब्बीर शेख याला नुकतंच शिंदे गटाचं शाखाप्रमुख पद सुद्धा देण्यात आलं होतं.

डोंबिवलीत चुगली करतो म्हणून मित्राकडून मित्राची हत्या

दारूच्या गुत्यावर चुगली करतो म्हणून दोन मित्रांनी मिळून एका मित्राची हत्या केल्याची घटना डोंबिवलीमधील सोनार पाडा परिसरात घडली. हत्येनंतर मृतदेह दोन मजली इमारतीच्या खिडकीतून फेकल्याची घटना घडली आहे. मानपाडा पोलिसांनी हत्या करून पळ काढणाऱ्या दोन्ही आरोपींना दोन तासात ठोकल्या बेड्या ठोकल्या आहेत. राजेश रामवृक्ष असे मयत व्यक्तीचे नाव आहे, तर दादू जाधव उर्फ पाटील आणि विनोद पडवळ अशी आरोपींची नावे आहेत.

हे सुद्धा वाचा

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.